28 C
Mumbai
Monday, September 7, 2026
घरबिजनेसमध्यपूर्वेतील युद्धाची धग शेअर बाजाराला; सेन्सेक्स ४७२ अंकांनी घसरला

मध्यपूर्वेतील युद्धाची धग शेअर बाजाराला; सेन्सेक्स ४७२ अंकांनी घसरला

विक्रीचा जोर कायम

Google News Follow

Related

अमेरिका आणि इराणमधील वाढत्या लष्करी संघर्षाचे पडसाद भारतीय शेअर बाजारावर उमटले आहेत. कमजोर जागतिक संकेत आणि मध्यपूर्वेतील तणावामुळे मंगळवारी बाजार उघडताच मोठ्या प्रमाणात विक्री झाली. परिणामी, सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही प्रमुख निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत होते. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ४७२.९६ अंकांनी म्हणजेच ०.६१ टक्क्यांनी घसरून ७६,४७१.३२ अंकांवर आला. तर निफ्टीमध्ये १९७.८० अंकांची किंवा ०.८२ टक्क्यांची घसरण झाली आणि तो २३,८५८ अंकांवर पोहोचला. यासह निफ्टीने २४,००० अंकांची महत्त्वाची पातळी गमावली.

बाजारातील घसरण केवळ काही निवडक शेअर्सपुरती मर्यादित राहिली नाही. बहुतांश क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये विक्रीचा जोर दिसून आला. निफ्टी ऑटो, आयटी, रिअॅल्टी, कंझम्प्शन, इंडिया डिफेन्स आणि फायनान्शियल सर्व्हिसेस या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक घसरण नोंदवण्यात आली.

मोठ्या कंपन्यांच्या शेअर्ससह मध्यम आणि छोट्या कंपन्यांनाही या विक्रीचा फटका बसला. निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक ७२५.८० अंकांनी अर्थात १.१५ टक्क्यांनी घसरून ६२,६०८.७० अंकांवर पोहोचला. दुसरीकडे, निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांकात १९९.८५ अंकांची म्हणजेच १ टक्क्यांची घसरण झाली आणि तो १९,६८६.४० अंकांवर व्यवहार करत होता.

सेन्सेक्समधील सन फार्मा आणि अदानी पोर्ट्स हे मोजकेच शेअर्स तेजीमध्ये होते. तर इन्फोसिस, एचसीएल टेक, टीसीएस, इंडिगो, महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी बँक, एनटीपीसी, टेक महिंद्रा, बीईएल, एशियन पेंट्स, इटरनल, आयटीसी, टाटा स्टील, मारुती सुझुकी, बजाज फिनसर्व आणि टायटनच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

जागतिक बाजारांमध्येही नकारात्मक वातावरण

भारतीय बाजाराप्रमाणेच आशियातील प्रमुख शेअर बाजारांमध्येही कमजोरी दिसून आली. टोकियो, शांघाय, हाँगकाँग, सोल आणि बँकॉक येथील बाजार घसरणीसह व्यवहार करत होते. यापूर्वी अमेरिकन बाजारही नकारात्मक पातळीवर बंद झाले होते. डाऊ जोन्समध्ये ०.७९ टक्के, तर नॅस्डॅकमध्ये १.०३ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली होती.

हे ही वाचा:

तामिळनाडूतील ५२ मंदिरांमध्ये स्मार्टफोनला बंदी

५.५ टन औषधांसह बचाव पथक घेऊन पाचवे विमान नेपाळकडे रवाना

होर्मुझवर अमेरिकेचे जवळपास पूर्ण नियंत्रण!

अमेरिकेकडून इराणमधील लग्नघरावर क्षेपणास्त्र हल्ला

अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा सुरू झालेला लष्करी संघर्ष हा जागतिक बाजारातील घसरणीमागील प्रमुख घटक मानला जात आहे. वृत्तांनुसार, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या (IRGC) विविध ठिकाणांवर हल्ले केले. या कारवाईत हवाई संरक्षण यंत्रणा, रडार प्रणाली, सागरी सुविधा, समुद्री सुरुंग पेरण्याशी संबंधित क्षमता आणि दळणवळण केंद्रांना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने जॉर्डन आणि इराकमधील अमेरिकन तळांवर हल्ले केल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. बेंचमार्क ब्रेंट क्रूडच्या किमतीत ४ टक्क्यांहून अधिक वाढ होऊन ते प्रति बॅरल ९५ डॉलरवर पोहोचले. तर डब्ल्यूटीआय क्रूडची किंमत ९० डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेली आहे. मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढल्यास जागतिक अर्थव्यवस्थेसह भारतीय बाजारावरही त्याचा परिणाम कायम राहण्याची शक्यता आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
330,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा