28 C
Mumbai
Monday, October 5, 2026
घरराजकारणबलात्कार प्रकरणे मिटवण्यासाठी ५ कोटी? पंजाबच्या मुख्यमंत्र्यांसह पत्नीवर आरोप

बलात्कार प्रकरणे मिटवण्यासाठी ५ कोटी? पंजाबच्या मुख्यमंत्र्यांसह पत्नीवर आरोप

भाजपचा आरोप

Google News Follow

Related

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि त्यांच्या पत्नी गुरप्रीत कौर मध्यस्थांमार्फत रॅकेट चालवत असल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे. या रॅकेटच्या माध्यमातून ५ कोटी रुपयांच्या बदल्यात बलात्काराची प्रकरणे मिटवली जात असल्याचा दावा भाजपने केला. हे आरोप इन्स्टाग्राम इन्फ्लूएन्सर गुरविंदर सिंग चहल यांच्याशी संबंधित आहेत. एका महिलेचे अपहरण आणि बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर चहल यांना पंजाब पोलिसांनी या आठवड्याच्या सुरुवातीला सोडले होते.

पत्रकार परिषदेत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी काही ऑडीओ क्लिप्स प्रसिद्ध केली. यामध्ये एक कथित मध्यस्थ बलात्कार आणि इतर गुन्हेगारी प्रकरणे मिटवण्यासाठी आपल्या राजकीय संबंधांचा वापर करत असल्याचे ऐकू येत असल्याचा भाजपचा दावा आहे. मात्र, या ध्वनिमुद्रित संभाषणांमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान किंवा त्यांच्या पत्नी गुरप्रीत कौर यांच्या नावाचा थेट उल्लेख नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. “भगवंत मान आणि त्यांची पत्नी लूटमार आणि भ्रष्टाचाराचे रॅकेट चालवत आहेत. याअंतर्गत ५ कोटी रुपयांच्या मोबदल्यात बलात्काराची कायदेशीर प्रकरणे मिटवण्यासाठी मध्यस्थांचा वापर केला जात आहे,” असा आरोप प्रदीप भंडारी यांनी केला.

या ध्वनिमुद्रित संभाषणांमुळे मुख्यमंत्री स्वतः एखादे प्रकरण मिटवण्यासाठी हस्तक्षेप करत आहेत का, असा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचेही भंडारी म्हणाले. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान हे सौदेबाजीचे ठिकाण बनले आहे का आणि कथित लाचखोरीचे पैसे अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत पोहोचतात का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हे ही वाचा:

‘झोरावर’ टँक ते हरित अमोनिया; भारत-बेल्जियम भागीदारीचे नवे पर्व

यासिन मलिकचे सरला भट हत्या प्रकरणाला आव्हान नाही!

कराची अंधारात! १६-२४ तासांच्या वीजकपातीने नागरिक हैराण

हवाई दलाच्या स्वदेशी शस्त्रसामर्थ्यात ‘खगांतक-243’ची भर

दरम्यान, शिरोमणी अकाली दलाने पंजाबच्या राज्यपालांची भेट घेत मुख्यमंत्री कार्यालयातील कथित भ्रष्टाचार तसेच बलात्काराच्या आरोपीला वाचवण्याच्या प्रयत्नांची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी केली. गुरविंदर सिंग चहल यांना बलात्कार प्रकरणातून वाचवण्यासाठी ५ कोटी रुपयांची मागणी केल्याच्या आरोपांनंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने भगवंत मान यांच्या पत्नीला नोटीस बजावली होती. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश रणजित सिंग यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा समावेश असलेल्या कथित सिंडिकेटबाबत केलेल्या तक्रारीनंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने ही कारवाई केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा