28 C
Mumbai
Monday, September 7, 2026
घरक्राईमनामामाथाडी युनियनच्या नावाने दहशत माजवणाऱ्या टोळीवर मोक्का

माथाडी युनियनच्या नावाने दहशत माजवणाऱ्या टोळीवर मोक्का

प्रोटेक्शन मनी’च्या नावाखाली खंडणी

Google News Follow

Related

माथाडी कामगार युनियनच्या नावाखाली स्वतःच्या टोळीचे वर्चस्व निर्माण करून कंपन्या आणि बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी उकळणाऱ्या संघटित टोळीविरोधात एमआयडीसी पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली असून, टोळीच्या आणखी चार संशयित साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
अंधेरी आणि मुंबई उपनगर परिसरातील कंपन्या, बांधकाम व्यावसायिक तसेच व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करून माथाडी कामगार युनियनच्या नावाखाली खंडणी वसूल करण्याचा प्रकार सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी नदिम नस्रुद्दीन शेख (२७) याच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे.
अटक आरोपींमध्ये पुरण अरुण सिंग ऊर्फ चड्डा (३९), रोहित मधुकर साळुंखे (२७), इम्रान बसुद्दीन हवाळदार (३७), सुरेश गुलाबचंद गौड ऊर्फ किशन (३०), आकाश मानसिंग सिंग ऊर्फ नेपाळी (३०), राजकुमार सेल्वन मुन्नुस्वामी ऊर्फ लाला आणि अर्जुन मुनियान मुथ्थू ऊर्फ डाकू (३७) यांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
भारताच्या जीडीपी आकड्यांवरून नवा वाद 

ड्रोनपासून रणगाड्यापर्यंत… बेल्जियमसोबतच्या करारांमधून स्वदेशी उत्पादनाला चालना

टीकाकारांनी समान गोष्टींची तुलना करायला हवी!

सोन्याच्या तस्करांवर डीआरआयचा ‘सर्जिकल स्ट्राईक’
पोलिसांच्या तपासानुसार, आरोपींनी माथाडी कामगार टोळीच्या नावाखाली बेकायदा कृत्य करण्यासाठी संघटित टोळी स्थापन केली होती. या टोळीचा प्रमुख कन्नन चिननादुराई वन्नियार ऊर्फ बडा कन्ना असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. स्वतःचा तसेच टोळीचा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी आणि परिसरातील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी या टोळीने हिंसा, जबरदस्ती, धमकी आणि खंडणीचा मार्ग अवलंबल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
कंपन्या आणि बांधकाम व्यावसायिकांना माथाडी कामगार युनियनच्या नावाखाली काम करण्यास मज्जाव करून ‘वाराई’ अथवा ‘प्रोटेक्शन मनी’च्या नावाखाली जबरदस्तीने पैसे उकळले जात होते. वाहनांचा रस्ता अडवणे, तलवारी, चाकू तसेच इतर हत्यारांचा वापर करून मारहाण करणे आणि दहशत निर्माण करणे, अशा प्रकारे टोळीचे बेकायदा कारनामे सुरू असल्याचे तपासात आढळले आहे. या कृत्यांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या टोळीतील आरोपींविरोधात यापूर्वी खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणे, जबर दुखापत करणे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. यामुळे संघटित गुन्हेगारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी MCOCA अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. सक्षम अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी मिळाल्यानंतर संबंधित गुन्ह्यात MCOCA कायद्याच्या कलम ३(१)(ii), ३(२) आणि ३(४) अन्वये वाढीव कलमे लावण्यात आली आहेत.
ही कारवाई पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे, सहायक पोलिस आयुक्त योगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास अधिकारी पोलिस निरीक्षक मनोजकुमार माने, सहायक पोलिस निरीक्षक राक्षे, पोलिस उपनिरीक्षक हुजरे, नवलें, धुरी, पर्वत आणि गोंदुकर यांचा पथकात समावेश होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
330,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा