31 C
Mumbai
Friday, November 13, 2026
घरक्राईमनामाम्यानमारच्या विमानावरील हल्ल्यामागे अमेरिकन भाडोत्री सैनिक

म्यानमारच्या विमानावरील हल्ल्यामागे अमेरिकन भाडोत्री सैनिक

एनआयएकडून गंभीर आरोप

Google News Follow

एनआयएकडून गंभीर आरोप

म्यानमारमधील एका नागरी विमानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) दिल्लीतील विशेष न्यायालयात मोठा दावा केला आहे. अमेरिकन भाडोत्री सैनिक (American mercenary) मॅथ्यू अॅरॉन व्हॅनडायक आणि सहा युक्रेनियन नागरिकांचा या हल्ल्याशी संबंध असल्याचा दावा एनआयएने केला आहे. हे सातही विदेशी नागरिक सध्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत.

एनआयएने मॅथ्यू व्हॅनडायक आणि युक्रेनियन नागरिक व्हिक्टर कामिन्स्की यांची तिहार तुरुंगात चौकशी करण्यासाठी न्यायालयाची परवानगी मागितली होती. विशेष न्यायालयाने ३१ ऑगस्ट रोजी एनआयएच्या अर्जाला मंजुरी दिली. माहितीनुसार, तब्बल १४ युक्रेनियन नागरिक वेगवेगळ्या तारखांना पर्यटक व्हिसावर भारतात आले होते. ते हवाई मार्गाने आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले आणि त्यानंतर मिझोरामला गेले. आवश्यक Restricted Area Permit किंवा Protected Area Permit न घेता त्यांनी म्यानमारमध्ये बेकायदेशीर प्रवेश केल्याचा आरोप आहे.

या विदेशी नागरिकांचा म्यानमारमधील जातीय सशस्त्र गटांना ड्रोन युद्ध, ड्रोन ऑपरेशन, ड्रोन तयार करणे आणि जॅमिंग तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्याचा हेतू होता, असा दावा NIAने केला आहे. हे गट म्यानमारच्या लष्करी जुंटाविरोधात सक्रिय असल्याचे तपास यंत्रणेने म्हटले आहे.

एनआयएच्या दाव्यानुसार, २० फेब्रुवारी रोजी म्यानमार नॅशनल एअरलाइन्सच्या ATR-72-600 विमानावर ड्रोन हल्ला करण्यात आला होता. म्यित्क्यिना येथून मांडले येथे जाण्यासाठी विमान तयार असताना त्यावर किमान दोन FPV कामिकाझे ड्रोनने हल्ला केल्याचा आरोप आहे. या ड्रोनमध्ये RPG प्रकारची स्फोटके बसवण्यात आली होती. हल्ल्यात विमानाच्या पुढील भागासह फ्युसेलाज आणि शेपटीच्या भागाचे नुकसान झाल्याचे तपासात समोर आले आहे. NIAच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात वापरण्यात आलेले ड्रोन स्थानिक बंडखोर गटांपर्यंत मॅथ्यू व्हॅनडायकशी संबंधित नेटवर्कद्वारे पोहोचवण्यात आले असावेत.

आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाइल, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून तपास यंत्रणेला छायाचित्रे, व्हिडिओ आणि व्हॉइस सॅम्पल्सच्या स्वरूपात आक्षेपार्ह माहिती मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. या पुराव्यांचा आरोपींसमोर सामना करून त्यांची पडताळणी करणे आवश्यक असल्याने दोघांची पुन्हा चौकशी करण्याची परवानगी मागण्यात आल्याचे एनआयएने न्यायालयाला सांगितले.

हे ही वाचा:

टॅक्सी-रिक्षाच्या मीटरमध्ये ‘जुगाड’; बनावट भाडेवाढ करून प्रवाशांची लूट

‘हनुमान अंश’ची बॉक्स ऑफिसवर कमाल! ७५ कोटींकडे झेप

सोनिया गांधींचे आत्मचरित्र हार्परकॉलिन्स इंडिया करणार प्रकाशित

फुकेट-दिल्ली एअर इंडियाच्या पायलटची ड्रग्ज चाचणी ‘नॉन-नेगेटिव्ह’

या प्रकरणात मार्च महिन्यात सात विदेशी नागरिकांना भारतातील विविध विमानतळांवरून अटक करण्यात आली होती. मॅथ्यू व्हॅनडायकला कोलकाता विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले होते, तर सहा युक्रेनियन नागरिकांना दिल्ली आणि लखनऊ विमानतळांवरून अटक करण्यात आली. या सर्वांवर भारताच्या सुरक्षेविरोधात दहशतवादी कारवायांचा कट रचल्याचे आरोप असून तपास अद्याप सुरू आहे. आरोपींना म्यानमारमधील व्यापक नेटवर्क आणि कथित कटाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी एनआयएकडून सखोल चौकशी केली जाणार आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा