35 C
Mumbai
Friday, October 2, 2026
घरविशेषफुकेट-दिल्ली एअर इंडियाच्या पायलटची ड्रग्ज चाचणी 'पॉझिटिव्ह'

फुकेट-दिल्ली एअर इंडियाच्या पायलटची ड्रग्ज चाचणी ‘पॉझिटिव्ह’

तांत्रिक बिघाडासह नवा खुलासा

Google News Follow

Related

फुकेटहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला हवेत गंभीर तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागलेल्या घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विमानाच्या वैमानिकाची सायकोॲक्टिव्ह अर्थात मनोप्रभावी पदार्थांसाठी करण्यात आलेली चाचणी ‘नॉन-नेगेटिव्ह’ आल्याचे विमान अपघात तपास ब्युरोच्या (AAIB) प्राथमिक अहवालात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) संबंधित वैमानिकाविरुद्ध योग्य ती कारवाई करावी, अशी शिफारस करण्यात आली आहे.

४ ऑगस्ट रोजी एअर इंडियाचे AI2379 हे एअरबस A320 विमान थायलंडमधील फुकेटहून दिल्लीकडे येत होते. विमान ३६ हजार फूट उंचीवर असताना त्याच्या तिन्ही हायड्रॉलिक प्रणालींमधील दबाव काही सेकंदांतच कमी झाला. ग्रीन, ब्लू आणि यलो या तिन्ही हायड्रॉलिक यंत्रणांमध्ये बिघाड झाल्याने ऑटोपायलट बंद झाला आणि काही क्षणांसाठी स्टॉल वॉर्निंगही सक्रिय झाली.

या तांत्रिक बिघाडादरम्यान विमानाच्या उंचीत अचानक मोठे चढ-उतार झाले. विमानाने आधी सुमारे ३७२ फूट उंची वाढवली आणि त्यानंतर सुमारे २९२ फूट खाली आले. या घटनेत २० प्रवासी आणि चार केबिन क्रू सदस्य जखमी झाले होते. काही सेकंदांनंतर हायड्रॉलिक यंत्रणा पुन्हा कार्यरत झाली आणि विमान नियंत्रण प्रणाली सामान्य झाली.

हे ही वाचा:

महापुरानंतर भारताकडे कोणतीही भरपाई मागितलेली नाही

GSLV-F17 चे यशस्वी प्रक्षेपण; पंतप्रधान मोदींकडून इस्रोचे कौतुक

नेपाळमध्ये दोन कामगारांची ९ दिवसांनी जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यातून सुटका

GSLV-F17 चे काउंटडाऊन सुरू; भारताचा पहिला जिओ-इमेजिंग उपग्रह झेपावणार

घटनेनंतर दोन्ही वैमानिकांची सायकोॲक्टिव्ह पदार्थांसाठी चाचणी करण्यात आली. प्राथमिक तपासणी आणि त्यानंतरच्या पुष्टीकरण चाचणीत पायलट-इन-कमांडचा निकाल ‘नॉन-नेगेटिव्ह’ आला, तर सहवैमानिकाची चाचणी निगेटिव्ह आली. AAIBने या निष्कर्षाची गंभीर दखल घेत DGCAला संबंधित वैमानिकाविरोधात आवश्यक ती कारवाई करण्याची शिफारस केली आहे. AAIBने हा केवळ प्राथमिक अहवाल असल्याचे स्पष्ट केले असून, विमानाच्या तिन्ही हायड्रॉलिक प्रणालींमध्ये एकाचवेळी दबाव का कमी झाला आणि या घटनेमागील नेमकी कारणे काय होती, याचा सखोल तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा