29 C
Mumbai
Saturday, September 26, 2026
घरबिजनेस'चीनवरील अवलंबित्वाचा धोका युरोपआधी भारताने ओळखला!'

‘चीनवरील अवलंबित्वाचा धोका युरोपआधी भारताने ओळखला!’

बेल्जियमच्या पंतप्रधानांनी केले मोदी सरकारचे कौतुक

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

चीनकडून होणारी स्वस्त मालाची मोठ्या प्रमाणावर होणारी आयात आणि चीनवरील युरोपची वाढती आर्थिक अवलंबित्व यावर बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांनी गुरुवारी जोरदार टीका केली. या धोक्यांबाबत भारताने युरोपीय देशांना आधीच इशारा दिला होता, मात्र त्यावेळी आम्ही तो गांभीर्याने घेतला नाही, आज आम्हाला ती बाब लक्षात आली आहे, अशी कबुली त्यांनी दिली. बेल्जियमच्या पंतप्रधानांनी दिलेल्या या कबुलीला फार महत्त्व आहे.

नवी दिल्ली येथे भारतीय उद्योग महासंघाच्या कार्यक्रमात बोलताना बेल्जियमच्या पंतप्रधानांनी सांगितले की, परदेशातून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या अतिरिक्त उत्पादनाच्या स्वस्त विक्रीमुळे युरोपच्या उद्योगांना मोठा धक्का बसला आहे. या प्रक्रियेमुळे युरोपातील औद्योगिक पाया कमकुवत झाला आणि परदेशावरील आर्थिक अवलंबित्व वाढत गेले. चीनवरील वाढत्या आर्थिक अवलंबित्वाचा धोका भारताने युरोपपेक्षा आधी ओळखला होता, असे त्यांनी स्पष्टपणे मान्य केले.

“भारताने हे आमच्यापेक्षा आधी ओळखले होते. भारताने आम्हाला इशाराही दिला होता. मात्र, आम्ही तो ऐकला नाही. आता मात्र आम्ही त्यातून धडा घेत आहोत आणि त्यानुसार निर्णय घेत आहोत,” असे डी वेव्हर यांनी म्हटले.

हे ही वाचा:

७६९ कोटींच्या दारुगोळा खरेदी घोटाळ्यानंतर एस्टोनियाच्या संरक्षण मंत्र्यांचा राजीनामा

फोक्सवॅगन ५० हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ

फुकेट-दिल्ली एअर इंडियाच्या पायलटची ड्रग्ज चाचणी ‘नॉन-नेगेटिव्ह’

६ वर्षांनंतर सीबीआय घासणार जादूचा दिवा |

“गेल्या काही वर्षांनी युरोपला कठोर वास्तवाची जाणीव करून दिली आहे. बराच काळ युरोपने आपल्या बाजारपेठांमध्ये उत्पादनखर्चापेक्षा कमी किमतीत मोठ्या प्रमाणावर माल येताना पाहिला. त्यामुळे आमचा औद्योगिक पाया कमकुवत झाला आणि जाणीवपूर्वक अशी अवलंबित्वाची परिस्थिती निर्माण झाली की, पुढे त्याचा दबाव आणण्यासाठी वापर केला जाऊ शकतो,” असे डी वेव्हर यांनी म्हटले.

डी वेव्हर यांनी आपल्या भाषणात चीनचे थेट नाव घेतले नाही. मात्र, युरोपवर आर्थिक दबाव आणण्यासाठी आपल्या आर्थिक सामर्थ्याचा वापर करणारा देश कोणता आहे, हे स्पष्ट असल्याचे त्यांनी सूचित केले. ते म्हणाले, या पद्धतीचा सर्वाधिक फायदा ज्या देशाला झाला, तो इथून फार दूर नाही. तो असा शेजारी आहे, ज्याला तुम्ही सर्वजण ओळखता,” असा टोला त्यांनी लगावला.

चीनवरील अतिअवलंबित्वाचे दुष्परिणाम युरोपला आता जाणवू लागले आहेत. भारताने याबाबत आधीच दिलेला इशारा युरोपने दुर्लक्षित केला होता, अशी बेल्जियमच्या पंतप्रधानांची कबुली त्यामुळे भारताच्या पूर्वीच्या भूमिकेला महत्त्व देणारी ठरली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा स्पष्ट रोख चीनकडे असल्याचे मानले जात आहे.

भारताची प्रशंसा

यावेळी बेल्जियमच्या पंतप्रधानांनी भारताचे विशेष कौतुक केले.  मुक्त व्यापाराला पाठिंबा देतानाच प्रत्येक देशाने आपल्या मूलभूत आर्थिक हितांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचेही बेल्जियमच्या पंतप्रधानांनी सांगितले. स्वतःच्या हिताचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. कारण त्यातूनच मुक्त व्यापारासाठी आवश्यक असलेला विश्वास निर्माण होतो. एखादा देश भोळसट नसेल आणि आपल्या मूलभूत हितांशी तडजोड करण्यास तयार नसेल, तरच मुक्त व्यापाराची संकल्पना विश्वासार्ह ठरते. हा विश्वास परस्पर सन्मानावर आधारित असतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या आर्थिक क्षेत्रांमध्ये निर्माण झालेली परदेशावरील अवलंबित्वाची स्थिती भविष्यात दबाव आणण्यासाठी वापरली जाऊ नये, यावरही त्यांनी भर दिला. “आमच्यावर कोणाचाही दबाव असावा, हे आम्हाला मान्य नाही. आमच्यावरील आर्थिक अवलंबित्वाचा वापर आमच्याविरुद्ध शस्त्र म्हणून केला जावा, हेही आम्हाला मान्य नाही,” असे डी वेव्हर यांनी म्हटले.

भारत-बेल्जियम संबंधांना नवी दिशा

बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर २ ते ४ सप्टेंबरदरम्यान भारताच्या दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. यापूर्वी भारत आणि बेल्जियमने संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी विविध करारांवर स्वाक्षऱ्या करण्यास सहमती दर्शवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बार्ट डी वेव्हर यांच्या चर्चेत व्यापार आणि गुंतवणूक, महत्त्वाची खनिजे, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अर्धसंवाहक या क्षेत्रांना भारत-बेल्जियम संबंध मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे आधारस्तंभ मानण्यात आले. जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्था अधिकाधिक तुकड्यात विभागली जात असताना भारत आणि बेल्जियममधील आर्थिक व संरक्षण सहकार्य वाढवण्यावर दोन्ही देशांनी भर दिला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा