30 C
Mumbai
Thursday, September 24, 2026
घरदेश दुनियाकेरळमधल्या भीषण अपघातात तमिळनाडूतील ८ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

केरळमधल्या भीषण अपघातात तमिळनाडूतील ८ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

भरधाव कार उभ्या ट्रकवर आदळली

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

केरळमधील त्रिशूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. कैपमंगलम परिसरात भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील आठही विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत झालेले सर्व विद्यार्थी तमिळनाडूचे रहिवासी असून, ते दिंडीगुल येथील पीएसएम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. पोलिसांच्या माहितीनुसार, हा अपघात रात्री सुमारे ११ वाजून ४० मिनिटांनी झाला.

राष्ट्रीय महामार्गावर सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. अशाच एका ठिकाणी ट्रक उभा होता. गुरुवायूरहून कोडुंगलूरच्या दिशेने जाणारी कार वेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट ट्रकवर जाऊन आदळली. धडक एवढी जोरदार होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताचे थरकाप उडवणारे दृश्य महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाले आहे.
हे ही वाचा:
मुंबई उच्च न्यायालयाचा ‘ओल्ड मॉन्क’च्या लेबलवर आक्षेप

समाजवादी पक्षाचा पदाधिकारी रस्त्यावरच पढत होता नमाज, एफआयआर दाखल

जंतर मंतर हल्लाप्रकरणी स्वतंत्र भारद्वाजला एक दिवसाची कोठडी

शिक्षकदिनी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी पंतप्रधानांची मनमोकळी ‘बात’

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी वाहनाचा काही भाग कापावा लागला. मात्र, बचाव पथक पोहोचेपर्यंत आठही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. सर्व मृतदेह त्रिशूर मेडिकल कॉलेजच्या शवागारात पाठवण्यात आले असून, त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर महामार्गावरील रस्ता कामाच्या ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था आणि इशारे लावण्यात आले होते का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा