37 C
Mumbai
Friday, October 9, 2026
घरक्राईमनामातब्बल १३ वर्षांनंतर नक्षलवादी हल्ल्यातील आरोपी दोषी

तब्बल १३ वर्षांनंतर नक्षलवादी हल्ल्यातील आरोपी दोषी

झीरम घाटी नक्षलवादी हल्ल्या प्रकरण

Google News Follow

Related

छत्तीसगडमधील झीरम घाटी नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी तब्बल १३ वर्षांनंतर महत्त्वपूर्ण निकाल लागला आहे. जगदलपूर येथील राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) विशेष न्यायालयाने २०१३ मधील या भीषण हल्ल्याप्रकरणी सर्व १० आरोपींना दोषी ठरवले आहे. या हल्ल्यात काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसह २९ जणांचा मृत्यू झाला होता.

२५ मे २०१३ रोजी छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील दरभा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झीरम घाटीत काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेतील नेत्यांच्या ताफ्यावर माओवाद्यांनी घातपात करून हल्ला केला होता. या हल्ल्यात तत्कालीन छत्तीसगड काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल, विरोधी पक्षनेते महेंद्र कर्मा आणि माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल यांच्यासह अनेक जणांचा मृत्यू झाला होता.

एनआयए विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अभय सिंह राजपूत यांनी या प्रकरणातील १० आरोपींना दोषी ठरवले. दोषी ठरलेल्या आरोपींमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. आरोपींना नेमकी किती शिक्षा सुनावायची, याबाबतचा निर्णय न्यायालयाने १६ सप्टेंबरपर्यंत राखून ठेवला आहे. या खटल्यादरम्यान तब्बल १०१ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. हल्ल्यानंतर सुरुवातीला बस्तर पोलिसांकडे या प्रकरणाचा तपास होता. मात्र, काँग्रेसने सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा आरोप केल्यानंतर काही दिवसांतच हा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला. एनआयएने सप्टेंबर २०१४ मध्ये विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

हे ही वाचा:

दिल्लीत रिपब्लिक चॅनेलच्या महिला पत्रकाराशी ‘कॉक्रोच’चे गैरवर्तन

S-400 खरेदीसाठी रशियासोबत ५० हजार कोटींची डील?

नेपाळमधील महाप्रलयातील मृतांचा आकडा १,३४४ वर

सहारनपूरमध्ये अनधिकृत मशिदीवर बुलडोझर

झीरम घाटी हल्ला हा छत्तीसगडच्या इतिहासातील सर्वांत भीषण माओवादी हल्ल्यांपैकी एक मानला जातो. या हल्ल्याने त्यावेळच्या छत्तीसगड काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला मोठा धक्का बसला होता. हल्ल्यात अनेक नागरिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला, तर ३० हून अधिक जण जखमी झाले होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा