29.4 C
Mumbai
Saturday, October 24, 2026
घरविशेषगणेशोत्सवातील डीजेविरोधात पुणेकर रस्त्यावर उतरले!

गणेशोत्सवातील डीजेविरोधात पुणेकर रस्त्यावर उतरले!

डीजे बंद करण्यासाठी मोर्चा, विद्यानंद बापट मात्र अनुपस्थित

Google News Follow

पुण्यातील कर्णकर्कश डीजे आणि वाढत्या ध्वनिप्रदूषणाविरोधात आज पुणेकर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. ‘लाऊडस्पीकर विरोधी पुणेकर मंचा’च्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर चौकातून पुणे महानगरपालिकेच्या दिशेने मोर्चा काढण्यात आला. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे नागरिकांना होणारा त्रास, ध्वनिप्रदूषणाचे आरोग्यावर होणारे परिणाम आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणारी कारवाई याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. आगामी गणेशोत्सवात कर्णकर्कश डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे आणि ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी डीजेच्या मोठ्या आवाजाविरोधात भूमिका घेतल्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेमुळे पुण्यातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. आजच्या मोर्चात बापट यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. ‘डीजे नको, शांततामय गणेशोत्सव हवा’, ‘ध्वनिप्रदूषण बंद करा’, अशा घोषणा देत आंदोलकांनी आपली भूमिका स्पष्ट केली. उत्सव साजरा करण्याचा अधिकार सर्वांना आहे; मात्र त्यासाठी इतर नागरिकांच्या आरोग्यावर आणि शांततेवर परिणाम होऊ नये, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

बापट मात्र अनुपस्थित

या विषयावर विद्यानंद बापट यांनी सुरुवातीपासून आपले मत व्यक्त केले. त्यांच्या वक्तव्यांची चर्चा झाली, त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पण या मोर्चात ते मात्र उपस्थित राहिले नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत होते. मध्यंतरी त्यांच्यावर संतोष चव्हाण नावाच्या इसमाने हल्ला केला होता. या घटनेची पार्श्वभूमी लक्षात घेता बापट यांना मोर्चात सहभागी होऊ नका असे सांगण्यात आले होते का, असाही प्रश्न उपस्थित झाला.

हे ही वाचा:


संयुक्त राष्ट्रांच्या नकाशात लडाख, जम्मू-काश्मीरबाबत तडजोड नाही!

पंजाबमध्ये स्वाईन फ्लूमुळे एका संशयिताचा मृत्यू

इंडोनेशियात अनाक क्राकाटोआ ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे राखेचे प्रचंड ढग

मध्य प्रदेशच्या सागरमध्ये विषारी दारूमुळे ११ जणांचा मृत्यू

मोर्चामध्ये विविध सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि ध्वनिप्रदूषणाविरोधात भूमिका घेणारे पुणेकर सहभागी झाले. डीजेच्या वाढत्या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी आणि आजारी व्यक्तींना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे केवळ उत्सवाच्या काळातच नव्हे, तर वर्षभर ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे, अशी मागणी आंदोलकांनी केली. नियम मोडणाऱ्या मंडळांवर आणि ध्वनिवर्धकांचा मर्यादेपेक्षा अधिक आवाज करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.

दरम्यान, विद्यानंद बापट यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढवला होता. त्यामुळे ते प्रत्यक्ष मोर्चात सहभागी झाले नसले, तरी त्यांच्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. या मोर्चामुळे पुण्यातील गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उत्सवाचा उत्साह कायम ठेवतानाच नागरिकांच्या शांततेचा आणि आरोग्याचा अधिकारही जपला पाहिजे, असा स्पष्ट संदेश या आंदोलनातून प्रशासनाला देण्यात आला. आता आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आणि पोलिस प्रशासन डीजेच्या वापराबाबत कोणती भूमिका घेते, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा