30.7 C
Mumbai
Friday, October 23, 2026
घरबिजनेसयूपीआय ही भारताच्या फिनटेक क्रांतीची प्रमुख शक्ती

यूपीआय ही भारताच्या फिनटेक क्रांतीची प्रमुख शक्ती

पंतप्रधान मोदी यांनी केले प्रतिपादन

Google News Follow

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भारताच्या फिनटेक क्षेत्राच्या विकासाचे कौतुक करत युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) हे या परिवर्तनामागील प्रमुख शक्ती असल्याचे सांगितले. तसेच, या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मचा जगभर विस्तार करण्याचे आवाहन केले.

मुंबईत आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६ मध्ये बोलताना मोदी यांनी जागतिक पातळीवर आव्हानात्मक परिस्थिती असतानाही भारताची आर्थिक वाढ आणि देशाच्या सुधारणाऱ्या सार्वभौम पतमानांकनाचा उल्लेख केला.

फिनटेक क्षेत्राबाबत पंतप्रधान म्हणाले, “भारताची फिनटेकची कहाणी अद्भुत आहे. याचा एक मोठा विजेता म्हणजे यूपीआय. हे इतके मोठे परिवर्तन आहे की, जेव्हा जेव्हा फिनटेकची चर्चा होईल, तेव्हा यूपीआयचा उल्लेख केल्याशिवाय ती चर्चा अपूर्ण राहील.”

ते म्हणाले, “दहा वर्षांपूर्वी, जेव्हा मी म्हणायचो की तुमची बँक तुमच्या बोटांच्या टोकावर असेल, तेव्हा काही लोकांना हे अशक्य वाटायचे. मी सुजाण आणि माहिती असलेल्या लोकांबद्दल बोलत आहे; त्यांचे चेहरे आठवा.”

ते पुढे म्हणाले, आपण ज्या वेळी या ठिकाणी बसलो आहोत, त्याच सुमारास सुमारे ५० हजार यूपीआय व्यवहार झाले असतील.”

हे ही वाचा:

उत्तर प्रदेशसाठी भाजपचा नवा फॉर्म्युला

रोहन पारीखला दिले होते पंतप्रधानांच्या खोट्या सहीचे ओळखपत्र

गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ

आयफोन १८ प्रोची उद्या ग्रँण्ड एन्ट्री

पंतप्रधानांनी यूपीआयला “सभ्यतेची कथा”  असे संबोधत भारताने ज्या देशांशी व्यापार केला आहे, त्या देशांमध्ये यूपीआयचा विस्तार करण्याची गरज असल्याचे सांगितले. यासाठी त्यांनी भारत-सिंगापूर यूपीआय नेटवर्कचे उदाहरण दिले.

दोन्ही देशांदरम्यानचे व्यवहार आता इतके सोपे झाले आहेत की, जसे भारतातील दोन शहरांमध्ये UPIद्वारे पैसे पाठवणे सोपे आहे, तितकेच भारत आणि सिंगापूरदरम्यान पैसे पाठवणे सोपे झाले आहे, असे मोदी यांनी सांगितले.

जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताच्या आर्थिक कामगिरीबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले, “सध्याच्या जागतिक परिस्थितीची तुम्हा सर्वांना पूर्ण जाणीव आहे. जग संघर्ष आणि अनिश्चिततेच्या टप्प्यातून जात आहे. ऊर्जा आणि वस्तूंच्या पुरवठा साखळीवर दबाव आहे. व्यापाराबाबत तणाव आहे. ही परिस्थिती गेल्या अनेक महिन्यांपासून कायम आहे.”

गणेशोत्सवाचा उल्लेख

महाराष्ट्रातील आगामी सणासुदीच्या काळाचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला.

ते म्हणाले, “काही दिवसांत महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गणेशोत्सवाला सुरुवात होईल. येथे प्रत्येक शुभ प्रसंगाच्या आधी भगवान गणेशाचे स्मरण केले जाते.”

यानंतर त्यांनी गणपती बाप्पांना नमन करत ग्लोबल फिनटेकसाठी उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा