29 C
Mumbai
Wednesday, October 7, 2026
घरस्पोर्ट्सटी-२० मालिकेत भारत-अफगाणिस्तान आमनेसामने

टी-२० मालिकेत भारत-अफगाणिस्तान आमनेसामने

Google News Follow

Related

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका १३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मालिकेतील सामने १३, १५ आणि १७ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. विशेष म्हणजे, ही मालिका भारतात होत असली तरी अफगाणिस्तान या मालिकेचा यजमान आहे. भारतात भारताचे यजमानपद स्वीकारण्याची अफगाणिस्तानची ही पहिलीच वेळ आहे.

अफगाणिस्तानने गेल्या काही वर्षांत जागतिक क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये त्यांनी अनेक बलाढ्य आणि विश्वविजेत्या संघांना पराभवाचा धक्का दिला आहे. मात्र, भारताविरुद्ध कोणत्याही फॉरमॅटमध्ये विजय मिळवण्यात अफगाणिस्तानला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे आगामी मालिकेत पहिल्या विजयासाठी अफगाणिस्तानचा संघ उत्सुक असेल.

अफगाणिस्तानच्या क्रिकेटच्या विकासात भारताची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. भारताने वेळोवेळी नोएडा आणि डेहराडूनमधील स्टेडियम्सचा वापर अफगाणिस्तानला घरच्या मैदानाप्रमाणे करण्याची परवानगी दिली आहे. या मैदानांवर अफगाणिस्तानने इतर संघांचे यजमानपदही भूषवले आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानेही क्रिकेटच्या विकासासाठी भारताने दिलेल्या सहकार्याचे कौतुक केले आहे.

काही दिवसांपूर्वी एसीबीने ‘एक्स’वर पोस्ट करत या मालिकेबाबत उत्साह व्यक्त केला होता. “ही अशी मालिका आहे, ज्याची देश आतुरतेने वाट पाहत आहे. इतिहास, संस्कृती आणि खेळाविषयीची समान आवड असलेल्या दोन देशांना पुन्हा एकत्र आणणारी ही मालिका आहे. हे केवळ सामने नाहीत, तर उत्साह, अभिमान आणि महत्त्वाची लढत आहे,” असे एसीबीने म्हटले होते.

भारताचे पारडे वरचढ

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत ९ टी-२० सामने झाले आहेत. त्यापैकी ७ सामन्यांत भारताने विजय मिळवला, तर १ सामना बरोबरीत सुटला आणि १ सामन्याचा निकाल लागला नाही. त्यामुळे आगामी मालिकेत अफगाणिस्तानसमोर भारताविरुद्ध पहिला विजय मिळवण्याचे मोठे आव्हान असेल.

अफगाणिस्तानने या मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. इब्राहिम जादरान संघाचे नेतृत्व करणार आहे.

अफगाणिस्तानचा टी-२० संघ

इब्राहिम जादरान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), नूर रहमान (यष्टीरक्षक), सेदिकुल्लाह अटल, दरविश रसूली, अजमतुल्लाह ओमरझाई, गुलबदिन नईब, मोहम्मद नबी, राशिद खान, नांग्याल खरोटी, नूर अहमद, मुजीब उर

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा