29 C
Mumbai
Wednesday, October 7, 2026
घरस्पोर्ट्सभारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने?

भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने?

Google News Follow

Related

पाकिस्तानने महिला आशिया कप २०२६ मध्ये दमदार विजय मिळवत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. पाकिस्तानने हाँगकाँग, चीनचा ७२ धावांनी पराभव केला. पाकिस्तानच्या विजयाची नायिका ठरली ती डावखुरी फिरकीपटू नाशरा संधू. तिने अवघ्या ४ षटकांत ७ धावा देत ६ विकेट्स घेतल्या.

या कामगिरीसह नाशरा संधूने इतिहास रचला. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात एका डावात ६ विकेट्स घेणारी ती पाकिस्तानची पहिली महिला क्रिकेटपटू ठरली.

या विजयामुळे पाकिस्तानने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पाकिस्तानचा उपांत्य फेरीतील दुसरा सामना ११ सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. तर १० सप्टेंबरला पहिल्या उपांत्य सामन्यात भारताचा सामना बांगलादेश आणि यूएई यांच्यातील विजेत्या संघाशी होईल.

दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत ८ विकेट्स गमावत १४३ धावा केल्या. शवाल जुल्फिकारने सर्वाधिक ४७ धावांची खेळी केली. तिने ३५ चेंडूंचा सामना करत ६ चौकार लगावले.

पाकिस्तानची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. मुनीबा अली अवघ्या ६ धावांवर बाद झाली. मात्र जुल्फिकारने डाव सावरत महत्त्वपूर्ण भागीदाऱ्या रचल्या. कर्णधार फातिमा सना हिने २४ चेंडूंत २४ धावा करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.

हाँगकाँगकडून जॉयलीन कौरने ४ षटकांत १९ धावा देत ४ विकेट्स घेतल्या.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा