29 C
Mumbai
Friday, September 25, 2026
घरबिजनेसऑरेकलकडून पुन्हा १०% कर्मचारी कपात

ऑरेकलकडून पुन्हा १०% कर्मचारी कपात

एआयसाठी अब्जावधींची गुंतवणूक

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

अमेरिकेतील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी ऑरेकलमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात सुरू झाली आहे. एआय आणि क्लाउड व्यवसायाच्या विस्तारासाठी कंपनी अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करत असतानाच सुमारे १० टक्के कर्मचाऱ्यांच्या हातात कंपनीने नारळ दिला आहे. १४ सप्टेंबरपासून कर्मचाऱ्यांना नोकरी समाप्त झाल्याचे ई-मेल मिळण्यास सुरुवात झाल्याचे वृत्त आहे. या ताज्या कपातीचा नेमका आकडा कंपनीने अधिकृतपणे जाहीर केलेला नाही. मात्र, या निर्णयामुळे मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ येण्याची शक्यता आहे.

ऑरेकलमध्ये याआधीही मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्यात आली होती. याआधी कंपनीने तब्बल २१ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. त्यामुळे पुन्हा सुरू झालेल्या कर्मचारी कपातीमुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. भारतातील कर्मचाऱ्यांवरही या निर्णयाचा परिणाम झाल्याचे वृत्त असून, विशेषतः उत्पादन अभियांत्रिकीशी संबंधित टीममधील कर्मचाऱ्यांना याचा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. भारतातील प्रभावित कर्मचाऱ्यांची अधिकृत संख्या मात्र अद्याप स्पष्ट झालेली नाही.
हे ही वाचा:
ऑगस्टमध्ये भारताच्या निर्यातीत २६ टक्क्यांची मोठी वाढ

भारत-न्यूझीलंड व्यापाराचा नवा अध्याय; मुक्त व्यापार कराराला हिरवा कंदील

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शाळेतल्या मित्राला दिला न्याय

मक्केकडे येणारा ड्रोन हवेतच उद्ध्वस्त; सौदीचा ‘रेड लाइन’चा इशारा

दरम्यान, ऑरेकलकडून कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरवर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे. एआय सेवांची मागणी वाढत असल्याने डेटा सेंटर, संगणकीय क्षमता आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कंपनी मोठा खर्च करत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ऑरेकलचा भांडवली खर्च तब्बल २८.५ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. आगामी काळात एआय पायाभूत सुविधांसाठी आणखी मोठी गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना आहे. त्यामुळे एका बाजूला एआयच्या भविष्यासाठी अब्जावधी डॉलर खर्च केले जात असताना, दुसऱ्या बाजूला खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी मनुष्यबळ कमी केले जात आहे.

एआयमुळे तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत असल्या, तरी त्याचवेळी कंपन्यांच्या कर्मचारी रचनेतही मोठे बदल होत आहेत. ऑरेकलच्या निर्णयातून हा विरोधाभास स्पष्टपणे समोर आला आहे. भविष्यातील एआय व्यवसाय उभारण्यासाठी कंपनी अब्जावधींची गुंतवणूक करत आहे; मात्र त्या विस्ताराच्या प्रक्रियेत आज हजारो कर्मचाऱ्यांच्या हातातील नोकरी निसटत आहे. त्यामुळे ऑरेकलमधील ताज्या कर्मचारी कपातीने तंत्रज्ञान क्षेत्रातील रोजगाराच्या बदलत्या वास्तवाकडे पुन्हा लक्ष वेधले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा