31 C
Mumbai
Monday, October 5, 2026
घरविशेषशहापूरजवळ कार-ट्रकच्या धडकेत दोन चिमुकल्यांसह चौघांचा मृत्यू

शहापूरजवळ कार-ट्रकच्या धडकेत दोन चिमुकल्यांसह चौघांचा मृत्यू

देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला

Google News Follow

Related

त्र्यंबकेश्वरचे देवदर्शन घेऊन मुंबईकडे परतणाऱ्या जयस्वाल कुटुंबाच्या आनंदाच्या प्रवासाला शहापूरजवळ भीषण अपघाताने काळा घाला घातला. नाशिक-मुंबई महामार्गावरील आटगाव येथे तांत्रिक बिघाड झालेली एर्टिगा कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जोरदार आदळली. या भीषण धडकेत दोन लहान मुलांसह चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये श्रीराम जयस्वाल (३४), सुरज जयस्वाल (२८), आयुष जयस्वाल (८) आणि अवंतिका जयस्वाल (११ महिने) यांचा समावेश आहे.

जोगेश्वरी येथील जयस्वाल कुटुंबीय त्र्यंबकेश्वरहून दर्शन घेऊन एर्टिगा कारने मुंबईकडे निघाले होते. आटगाव हद्दीत कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार रस्त्याच्या बाजूला गेल्या दोन वर्षांपासून बंद अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. धडक एवढी जोरदार होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि त्यातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, जोगेश्वरी परिसरावर शोककळा पसरली आहे.
हे ही वाचा:
काँग्रेस आमदाराची भाची सरकारी नोकरीसोबत करत होती ‘एमडी’

शहजाद भट्टी नेटवर्कवर केंद्राचा मोठा प्रहार

यूपीआय व्यवहारांवर ०.४ टक्के शुल्काला एसबीआयच्या माजी अध्यक्षांचा पाठिंबा

‘लालबागचा राजा सगळ्या मनोकामना पूर्ण करतो!’

या दुर्घटनेत राधिका जयस्वाल (३०), संतराम जयस्वाल (५०) आणि अंशिका जयस्वाल (७) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर सुनीता जयस्वाल (३८), शिवम जयस्वाल (१४), सतीश जयस्वाल (२४) आणि सुशी जयस्वाल (१५) यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. देवदर्शन करून सुखरूप घरी परतण्याचा जयस्वाल कुटुंबाचा प्रवास काही क्षणांतच दुःखद शोकांतिकेत बदलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा