31 C
Mumbai
Thursday, September 24, 2026
घरविशेषकाँग्रेस आमदाराची भाची सरकारी नोकरीसोबत करत होती 'एमडी'

काँग्रेस आमदाराची भाची सरकारी नोकरीसोबत करत होती ‘एमडी’

कर्नाटकातील डॉ. अंकिता यारगल यांची होणार चौकशी

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

कर्नाटकातील बागलकोटचे काँग्रेस आमदार उमेश मेती यांच्या भाचीच्या अडचणी वाढल्या आहेत. डॉ. अंकिता यारगल यांच्यावर सरकारी नोकरीसोबत पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेतल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. बागलकोटमधील सरकारी ‘नम्मा क्लिनिक’मध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त असलेल्या अंकिता यांना सेवेतून हटवण्यात आले असून, त्यांच्या अनुपस्थिती आणि कथित अनधिकृत दुहेरी नियुक्तीबाबत अधिकृत चौकशी सुरू आहे.

अंकिता यारगल या बागलकोटमधील नम्मा क्लिनिकमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. मात्र, त्या गेल्या काही महिन्यांपासून क्लिनिकमध्ये नियमित उपस्थित राहत नसल्याचे समोर आले. याच काळात त्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम करत असल्याचेही चौकशीत समोर आले आहे. त्यांना या नियुक्तीसाठी ७० हजार रुपयांहून अधिक वेतन किंवा मानधन मिळत असल्याचे वृत्त आहे.

हे ही वाचा:

भारतीय युद्धनौकेला पाकिस्तानी जहाज धडकल्यावर केली कानउघाडणी

भारत-न्यूझीलंड व्यापाराचा नवा अध्याय; मुक्त व्यापार कराराला हिरवा कंदील

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शाळेतल्या मित्राला दिला न्याय

मक्केकडे येणारा ड्रोन हवेतच उद्ध्वस्त; सौदीचा ‘रेड लाइन’चा इशारा

संबंधित प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर बागलकोट जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन बाळे यांनी अंकिता यारगल यांना नोटीस बजावली. सरकारी सेवेत असताना पदव्युत्तर शिक्षण घेत असल्याबाबत तसेच अनुपस्थित राहूनही वेतन किंवा मानधन घेतल्याच्या आरोपांबाबत त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले. चौकशीसाठी अंकिता यांना बुधवारी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, त्या चौकशीला उपस्थित राहिल्या नाहीत. आता त्यांना १८ सप्टेंबर रोजी संबंधित कागदपत्रांसह आणि लेखी स्पष्टीकरणासह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. अंकिता यांचे वडील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार यारगल यांनी मात्र आपल्या मुलीने एमडी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर कोणतेही वेतन घेतले नसल्याचा दावा केला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा