27.8 C
Mumbai
Saturday, November 7, 2026
घरदेश दुनियामक्काजवळ ड्रोन हल्ल्याच्या प्रयत्नावर भारताची चिंता

मक्काजवळ ड्रोन हल्ल्याच्या प्रयत्नावर भारताची चिंता

नागरिक, पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांचाही निषेध

Google News Follow

सौदी अरेबियातील पवित्र शहर मक्काजवळ ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेवर भारताने चिंता व्यक्त केली आहे. या घटनेबाबत भारताने गंभीर चिंता व्यक्त करताना नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणाऱ्या हल्ल्यांचाही निषेध केला आहे.

सौदी नेतृत्वाखालील आघाडीने दिलेल्या माहितीनुसार, मक्काच्या दक्षिणेकडे येणारा ड्रोन सौदी हवाई संरक्षण यंत्रणेने मक्काच्या प्रतिबंधित हवाई हद्दीत प्रवेश करण्यापूर्वीच हवेत नष्ट केला. सौदी आघाडीचे प्रवक्ते तुर्की अल-मलिकी यांनी ही माहिती दिली. या घटनेनंतर मक्का, जेद्दा आणि तैफ परिसरात सुरक्षा सतर्कता वाढवण्यात आली होती. या ड्रोन हल्ल्यामागे येमेनमधील हुथी संघटनेचा हात असल्याचा आरोप सौदीकडून करण्यात आला आहे. सौदी आघाडीने मक्काच्या सुरक्षेला अत्यंत महत्त्व देत या घटनेवर कठोर भूमिका घेतली आहे. मात्र, हुथींकडून मक्काला किंवा इतर धार्मिक स्थळांना लक्ष्य केल्याचा आरोप फेटाळण्यात आला आहे.

दरम्यान, भारताने केवळ मक्काजवळील ड्रोन हल्ल्याच्या प्रयत्नावरच चिंता व्यक्त केलेली नाही, तर नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांवर होणाऱ्या हल्ल्यांनाही विरोध दर्शवला आहे. भारताच्या भूमिकेत नागरिकांच्या सुरक्षेला आणि महत्त्वाच्या नागरी सुविधांच्या संरक्षणाला महत्त्व देण्यात आले आहे.

हे ही वाचा:

काँग्रेस आमदाराची भाची सरकारी नोकरीसोबत करत होती ‘एमडी’

भारतीय युद्धनौकेला पाकिस्तानी जहाज धडकल्यावर केली कानउघाडणी

भारत-न्यूझीलंड व्यापाराचा नवा अध्याय; मुक्त व्यापार कराराला हिरवा कंदील

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शाळेतल्या मित्राला दिला न्याय

भारताने म्हटले आहे की, “मक्काजवळ झालेल्या ड्रोन हल्ल्याबाबत आम्ही अत्यंत चिंतित आहोत. सौदी अरेबियाच्या सार्वभौम भूभागावर होणाऱ्या हल्ल्यांचा तसेच नागरिकांचे जीव आणि पायाभूत सुविधांना धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही कृतीचा भारत पुन्हा निषेध करतो. मक्का शहराला जगभरातील मुस्लिमांसाठी असलेले विशेष महत्त्व लक्षात घेता, मक्केजवळ घडलेली ही घटना विशेषतः चिंताजनक आहे. या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य लवकरात लवकर पुन्हा प्रस्थापित व्हावे, अशी भारताची अपेक्षा आहे.”

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा