29 C
Mumbai
Friday, September 25, 2026
घरस्पोर्ट्सआशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाची बांगलादेशवर मात

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाची बांगलादेशवर मात

आता अंतिम लढत श्रीलंकेशी

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील महिला क्रिकेट स्पर्धेत महिला आशिया कप २०२६ ची पुनरावृत्ती पाहायला मिळणार आहे. महिला आशिया कप २०२६ प्रमाणेच या स्पर्धेत महिला क्रिकेटचा अंतिम सामना भारतीय संघ आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे.

रविवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशचा ११४ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. कोरोगी स्पोर्ट्स पार्क येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने सलामीची फलंदाज शेफाली वर्माच्या आक्रमक शतकाच्या जोरावर ४ बाद १९५ धावा केल्या.

शेफालीने अवघ्या ४९ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. हे तिच्या आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीतील पहिले शतक ठरले. शेफालीने ४९ चेंडूंमध्ये ९ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने नाबाद १०० धावांची खेळी केली. या शतकासह शेफालीने सर्वात वेगवान टी-२० शतक करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेटपटू म्हणून स्मृती मंधानाच्या विक्रमाची बरोबरी केली. स्मृती मंधानाने २०१८ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ४९ चेंडूंमध्येच शतक झळकावले होते.

हे ही वाचा:

काँग्रेस हा विदुषकांचा पक्ष बनलाय!

झारखंडचा ३० लाखांचे इनाम असलेला नक्षली ब्रजेश गंझूचे वाराणसीत एन्काऊंटर

कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या १२ तास उशिराने

कोस्टल रोडवरून खाली कोसळली भरधाव बीएमडब्ल्यू; तिघे मृत्युमुखी

शेफालीव्यतिरिक्त स्मृती मंधानाने १९ चेंडूंमध्ये २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या, तर कर्णधार हरमनप्रीत कौरने ३३ चेंडूंमध्ये ६ चौकारांच्या मदतीने ४० धावांची खेळी केली. बांगलादेशकडून मारूफा अख्तर, संजीदा अख्तर, राबिया खान आणि नाहिदा अख्तर यांनी प्रत्येकी १ फलंदाज बाद केला.

१९६ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेला बांगलादेशचा संपूर्ण संघ १५.४ षटकांत ८१ धावांवरच गारद झाला. सलामीची फलंदाज दिलारा अख्तरने सर्वाधिक २४ धावा केल्या. भारतीय संघाकडून नंदिनी शर्मा आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. श्री चरणीला २ गडी बाद करण्यात यश आले. क्रांती गौड आणि श्रेयंका पाटील यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

भारतीय क्रिकेट संघ आता श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे. हा अंतिम सामना मंगळवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी १०.३० वाजता सुरू होईल. श्रीलंकेने रविवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला होता.

एशियन गेम्स २०२६ मध्ये महिला क्रिकेटमधील कांस्यपदकासाठी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. हा सामनादेखील मंगळवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ५.३० वाजता खेळवला जाईल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा