29 C
Mumbai
Friday, September 25, 2026
घरविशेषझारखंडचा ३० लाखांचे इनाम असलेला नक्षली ब्रजेश गंझूचे वाराणसीत एन्काऊंटर

झारखंडचा ३० लाखांचे इनाम असलेला नक्षली ब्रजेश गंझूचे वाराणसीत एन्काऊंटर

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे रविवारी सकाळी उत्तर प्रदेश एटीएससोबत झालेल्या चकमकीत झारखंडमधील प्रतिबंधित नक्षली संघटना तृतीय प्रस्तुती कमिटी (टीपीसी)चा प्रमुख ब्रजेश गंझू उर्फ गोपाल सिंह भोक्ता ठार झाला. त्याच्यावर झारखंड सरकार आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मिळून एकूण ३० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेंगरा मोडजवळ रविवारी पहाटे सुमारे पाच वाजता ही चकमक झाली. ब्रजेश गंझू मोटारसायकलवरून रामनगरमार्गे मुगलसरायच्या दिशेने जाणार असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानंतर एटीएसच्या पथकाने परिसरात नाकाबंदी करून घेराव घातला.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मोटारसायकलवरून आलेल्या ब्रजेशला थांबण्याचा इशारा करण्यात आला. मात्र, त्याने एटीएस पथकावर गोळीबार सुरू केला. एटीएसचे उपअधीक्षक विपिन राय यांनी सांगितले की, ब्रजेशने केलेल्या गोळीबारातील गोळ्या त्यांच्या तसेच हेड कॉन्स्टेबल नितेंद्र कृष्ण यांच्या बुलेटप्रूफ जॅकेटवर आदळल्या. त्यानंतर एटीएस पथकाने प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. यात ब्रजेशला गोळी लागली.

हे ही वाचा:

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची सुरुवात रौप्यपदकाने

पेट्रोल पंपांवर यूपीआय पेमेंटबाबत मोठा बदल

द्वादशम तू गजानन, १२ नावांची कथा!

२०० किलोचा लोखंडी खांब १३व्या मजल्यावरून पोलिस ठाण्याच्या छतावर कोसळला

जखमी अवस्थेतील ब्रजेशला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. चकमकीदरम्यान त्याचा एक साथीदार घटनास्थळावरून फरार झाला. एटीएसने घटनास्थळावरून दोन पिस्तुले, जिवंत काडतुसे आणि रिकाम्या काडतुसांचे खोके जप्त केले आहेत. ब्रजेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी लाल बहादूर शास्त्री रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे.

ब्रजेश गंझू हा झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील लावालौंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी होता. पोलीस आणि तपास यंत्रणांच्या नोंदीनुसार, तो दीर्घकाळापासून सुरक्षा यंत्रणांच्या वॉन्टेड यादीत होता. झारखंड सरकारने त्याच्यावर २५ लाख रुपये, तर एनआयएने ५ लाख रुपये असे एकूण ३० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा