38 C
Mumbai
Tuesday, October 13, 2026
घरक्राईमनामा२०० किलोचा लोखंडी खांब १३व्या मजल्यावरून पोलिस ठाण्याच्या छतावर कोसळला

२०० किलोचा लोखंडी खांब १३व्या मजल्यावरून पोलिस ठाण्याच्या छतावर कोसळला

अधिकारी,कर्मचारी थोडक्यात बचावले

Google News Follow

Related

कांजूरमार्ग पूर्व कांजूरमार्ग पोलिस ठाण्याच्या शेजारी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या १३ व्या मजल्यावरून २०० किलोचा लोखंडी खांब पोलीस ठाण्याच्या एका कार्यालयाची घटना शुक्रवारी सायंकाळी समोर आली आहे.सुदैवाने या दुर्घटनेत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी थोडक्यात बचावले आहे. या घटनेत पोलिस कार्यालयाच्या पत्र्यांचे नुकसान झाले. तसेच बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याने मानवी जीवितास धोका निर्माण केल्याचा आरोप करत बांधकाम व्यावसायिकासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कांजूरमार्ग पोलिस ठाण्यातील तक्रारदार विश्वास देसाई हे तपास पथकात कार्यरत आहेत. १८ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता ते कर्तव्यावर हजर झाले होते. दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास ते कार्यालयात संगणकावर काम करत असताना अचानक मोठा आवाज झाला. बाहेर येऊन पाहिले असता कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील झाडावर आणि कार्यालयाच्या पत्र्यांवर लोखंडी खांब पडलेला आढळला.

हे ही वाचा:

लोखंडी गेट अंगावर कोसळून प्लंबरचा मृत्यू

ऐन विशीतच वाटले होते करिअर संपले, पण…

सौदीकडून भारताला तेलपुरवठा घटण्याची शक्यता

११ टन साहित्य घेऊन नेपाळसाठी नववे विमान रवाना

बांधकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता हा खांब बांधकामाच्या ठिकाणाहून खाली पडल्याचे सांगण्यात आले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कांजूरमार्ग पोलीस ठाण्याच्या शेजारी एका इमारतीचे बांधकाम प्रकल्पाचे काम सुरू आहे. बांधकामादरम्यान छोटे दगड, खडी तसेच लोखंडी सळ्या आदी वस्तू खाली पडत असल्याने कंत्राटदाराला यापूर्वीही खबरदारी घेण्यास सांगण्यात आले होते. मात्र, तक्रारीनुसार बांधकामाच्या सुमारे १३ व्या मजल्यावरून सुमारे २०० किलो वजनाचा लोखंडी खांब खाली पडला.

या प्रकरणी पोलिसांनी धमतेश जैन (साइट कंत्राटदार), निराज रामचंद्र जगताप (साइट इंजिनीअर), विक्रम (सेफ्टी सुपरवायझर) आणि सोहेल धर्मजा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेतील कलम १२५, २९०, ३२४(३) आणि ३(५) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा