28 C
Mumbai
Sunday, September 20, 2026
घरक्राईमनामालोखंडी गेट अंगावर कोसळून प्लंबरचा मृत्यू

लोखंडी गेट अंगावर कोसळून प्लंबरचा मृत्यू

बांधकाम साइटवरील निष्काळजीपणाविरोधात गुन्हा

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

एलबीएस मार्गालगत सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी लावलेले लोखंडी गेट दुचाकीवरून जात असलेल्या प्लंबरच्या अंगावर कोसळल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी पार्कसाइट पोलिसांनी साइट सुपरवायझरसह प्रोजेक्ट डायरेक्टर, मॅनेजर आणि संबंधित कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

एफआयआरनुसार, मृत व्यक्तीचे नाव वसी हैदर रिझवी (५४) असून ते प्लंबिंगचे काम करत होते. १८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास ते कामासाठी घराबाहेर पडले होते. त्याच दिवशी सकाळी साडेअकराच्या सुमारास ते दुचाकीवरून रोझारी बिल्डिंग, एलबीएस रोड, मुलुंडच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवरील परिसरातून जात असताना बांधकामाच्या ठिकाणी लावण्यात आलेले लोखंडी गेट त्यांच्या अंगावर कोसळले.गंभीर दुखापत झाल्याने त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच दुपारी १२.३५ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हे ही वाचा:

नुकसानीचा दावा करण्याइतपतही अब्रू शिल्लक नाही काय?

देशाची ऊर्जेची गरज भागविण्यासाठी आम्हाला सर्व पर्याय खुले!

तृणमूल काँग्रेसच्या नाव-चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात

पवन सेहरावत होणार भारताचा ध्वजवाहक

कुटुंबीयांना पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी लोखंडी गेट लावण्यात आले होते. हे गेट योग्य ती खबरदारी आणि सुरक्षेच्या उपाययोजना न करता लावण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. गेट दुचाकीवरून जाणाऱ्या वसी रिझवी यांच्या अंगावर पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या घटनेप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पल्लवी अरुण सदांशिव यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
साइटवरील सुरक्षेची जबाबदारी असतानाही आवश्यक खबरदारी न घेतल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप तक्रारदार अली रझा वसी हैदर रिझवी यांनी केला आहे. साइट सुपरवायझरसह प्रोजेक्ट डायरेक्टर, मॅनेजर आणि संबंधित कंपनीच्या विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा