27 C
Mumbai
Wednesday, September 23, 2026
घरसंपादकीयनुकसानीचा दावा करण्याइतपतही अब्रू शिल्लक नाही काय?

नुकसानीचा दावा करण्याइतपतही अब्रू शिल्लक नाही काय?

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी आज मातोश्री निवासस्थानी जाऊन ५०० कोटींच्या बदनामीची नोटीस आदित्य ठाकरे यांना दिली. दिशा आणि सुशांतचा संशयास्पद मृत्यू झाल्यापासून ठाकरे कुटुंबीयांवर सतत आरोप होत आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तोंड उघडलेले आहे. वरुण सरदेसाई यांनी ‘आता यापुढे सहन करणार नाही’, असा इशारा दिला आहे. या सगळ्या गर्जना मातोश्रीवर येणाऱ्या निवडक पत्रकारांसमोर चालल्या आहेत. ही लढाई न्यायालयात सुरू आहे, तिथे एखादा मानहानीचा किंवा अब्रुनुकसानीचा दावा ठोकून होत असलेल्या आरोपांना चाप बसवावा, असे ठाकरेंना चुकूनही वाटत नाही. अन्यथा आतापर्यंत ते झाले असते. बहुधा नुकसानीचा दावा करण्याइतपत अब्रू आता उरलेली नाही.

एफआयआरमध्ये मोदी आणि ट्रम्प यांचे नाव नाही, असे फाजील विधान उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांसमोर केले. तुमच्यावर असे आरोप होऊ शकतात, असे पत्रकारांना बजावले. एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या विरोधात असे आरोप झाले असते, तर तो मुळात इतके दिवस गप्प बसला नसता. ठाकरेंनी वेळीच नाईट लाईफवाल्या लाडक्या मुलाला काही प्रश्न विचारले असते, तर आज ही वेळ त्यांच्यावर आली नसती. ऍड. नीलेश ओझा यांनी आज उद्धव ठाकरे हे मुख्य आरोपींपैकी आहेत, असा खळबळजनक दावा केला आहे. कारण या प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालण्यासाठी त्यांनी सगळ्या सरकारी यंत्रणेला कामाला लावले. वेळप्रसंगी स्वतः समोर येऊन आरोपींचा बचाव केला.

२८ नोव्हेंबर २०१९ रोजी ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर पुढच्या सहा महिन्यांत त्यांनी सचिन वाझेच्या पोलीस खात्यातील परतीचा मार्ग मोकळा केला. दिशाचा संशयास्पद मृत्यू होण्याच्या फक्त दोन दिवस आधी वाझेचे पोलीस दलात पुनरागमन आणि थेट क्राईम इंटेलिजन्स युनिटमध्ये वर्णी हे ठाकरेंच्या कृपेशिवाय शक्य नव्हते. वाझेला निलंबित करा, हा उच्च न्यायालयाचा आदेश होता. ठाकरेंना तो धाब्यावर का बसवावासा वाटला, अनेकांना हा प्रश्न पडलेला आहे.

वाझेची पोलीस दलात घरवापसी झाल्यानंतर राज्यात संशयास्पद मृत्यू आणि आत्महत्यांचे एक सत्र सुरू झाले. कोणी गळफास घेत होता, कोणी अपघातात बळी पडत होता. एक-दोन नव्हे, दिशा आणि सुशांतशी घट्ट संबंध असलेल्या अनेकांचे संशयास्पद मृत्यू झाले किंवा ते गायब झाले. ‘क्यूकी डिजिटल मीडिया’चा सीईओ समीर बंगेरा याचा मुंबईबाहेर अपघातात मृत्यू झाला. सुशांतच्या मृत्यूनंतर आनंदी धवन ही अभिनेत्री गायब झाली. दिशाचा जवळचा मित्र स्टीव्ह पिंटो जो दिशाच्या मृत्यूनंतर सतत इन्स्टाग्रामवर कोडेड मेसेज टाकत होता; ‘पॉवरफुल पॉलिटीशियन’, ‘फार्म हाऊस’, ‘पॉर्नफूड’ अशा प्रकारचे हॅशटॅग त्याने या पोस्टमध्ये वापरले होते. तो दिशाचा होणारा पती रोहन रायचा नातेवाईक होता. त्याचा ३० जून रोजी एका संशयास्पद अपघातात मृत्यू झाला. सुशांतचा मित्र टीव्ही अभिनेता समीर शर्मा याने ५ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. हे सगळे तरुण होते. अवघे आयुष्य त्यांच्यासमोर होते. त्यांच्या आयुष्यावर नेमके कोणाचे सावट पडले होते, याचा शोध घेण्याची गरज आहे. ‘प्रकरण दोन हत्यांचे नसून १३ हत्यांचे आहे, मला ही माहिती उघड करायची आहे’, असा निरोप सचिन वाझे याने ऍड. नीलेश ओझा यांच्याकडे पाठवला होता.

वाझे पोलीस खात्यात रुजू झाल्यानंतर तो पोलिसासारखा नाही तर माफियासारखा वागत होता. तो मोहिमेवर असल्यासारखा वागत होता. वाझेला अँटालिया प्रकरणी एनआयएने अटक केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारवर टीका केली होती. ‘वाझे हा लादेन आहे का?’ असा सवाल ठाकरे यांनी केला होता. वाझेच्या अटकेनंतर ठाकरे इतके का कळवळले होते? महाविकास आघाडी सरकारच्या काळात ठाकरेंचा अत्यंत विश्वासू माणूस अँटालिया प्रकरणात कसा सापडला? तो रंगेहात सापडल्यानंतरही त्याची उघड वकिली करण्याचे काम मुख्यमंत्रीपदी असलेले ठाकरे का करत होते? हे जर संशयास्पद नसेल तर जगात काहीच संशयास्पद असू शकत नाही.

विरोधकांकडून आपली राजकीय बदनामी केली जात असल्याचा दावा ठाकरे पिता-पुत्र करतायत, जे वास्तव नाही. आरोप कोवळ्या वयात जीव गमावलेल्या एका तरुणीच्या पित्याचा आहे. एफआयआरमध्ये मोदी आणि ट्रम्प यांची नावे नाहीत, कारण या प्रकरणाशी त्यांचा संबंध नाही. ठाकरेंचा संबंध आहे, हा दावा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी केलेला नाही. हा दावा सतीश सालियान यांनी केलेला आहे. सालियान आणि रोहन राय यांनी न्यूज लाँड्रीला दिलेल्या मुलाखतीत दिशाच्या मृत्यूत काहीच संशयास्पद नाही, असे विधान केले होते. हे विधान ठाकरेंचे समर्थक ठाकरेंच्या बचावासाठी वापरतायत. सतीश सालियान यांनी त्यावेळी असे विधान केले नसते, तर कदाचित त्यांचाही अपघाती मृत्यू झाला असता किंवा त्यांनी छताला दोर लटकवून आत्महत्या केली असती.

गेल्या काही वर्षांत जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप झाले, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मातोश्री किंवा शिवसेना भवनात पत्रकार परिषदा घेतल्या आणि सगळे खुलासे पत्रकारांसमोर केले. पत्रकार हेच त्यांचे न्यायाधीश आहेत. मातोश्रीवर येणारे पत्रकार ठाकरेंच्या पुचपुचीत कोट्यांवर हसायला येतात की प्रश्न विचारायला, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. दिशाने इमारतीवरून आत्महत्या केली होती तर तिच्या मृतदेहातील हाडे शाबूत कशी? तिचा चेहरा शाबूत कसा? तिच्या अंगावर रक्ताचे डाग का नव्हते? इमारतीपासून तिचा मृतदेह २५ फुटांवर कसा? जिथे पडली तिथे रक्ताचे डाग का नव्हते? दिशाच्या मृत्यूच्या दिवशी तिथे नव्हतो, असे आदित्य ठाकरे का खोटे बोलले? दिशाप्रकरणी न्यायालयाने क्लीन चिट दिल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र न्यायालयात त्यांनी का सादर केले? त्यानंतर माफी का मागितली? यातला एकही प्रश्न विचारण्याचे धाडस मातोश्रीवरील एकाही पत्रकाराला होऊ नये, हे कोडेच आहे.

हे ही वाचा:

पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरच्या पर्यटनाला पुन्हा बहर

इस्रायलला माहिती दिल्याच्या आरोपात इराणी नागरिकाला फाशी

११ टन साहित्य घेऊन नेपाळसाठी नववे विमान रवाना

एझिमला नौदल अकादमीतून बांगलादेशी नागरिकाला अटक

हे प्रकरण पुन्हा चर्चेत आल्यापासून यातून काहीही निष्पन्न होणार नाही, असे म्हणणाऱ्यांचा एक मोठा गट आहे. दिशावर अत्याचार झाला नाही, असे त्यांचे अजिबात म्हणणे नाही. त्यांची ही भावना अनुभवातून आलेली आहे; त्याहीपेक्षा निराशेतून. बड्या धेंडांचे काहीही वाकडे होत नाही, एका ठराविक पातळीनंतर ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ अशी भूमिका घेतात, एकमेकांचे हितसंबंध जपतात, असे चित्र आजपर्यंत दिसले आहे. प्रश्न फक्त दिशाच्या मृत्यूचा नाही. मनसुख हिरेनच्या हत्येत वाझे होता. त्याला का मारण्यात आले? कारण तो बोलेल अशी भीती होती. स्टीव्ह पिंटोला का मारण्यात आले? कारण तोही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. बाकीच्यांनी का मरण कवटाळले? कारण त्यांना काहीतरी भयंकर असे ठाऊक होते.

वाझे म्हणालाय १३ हत्या झालेल्या आहेत. चर्चा फक्त दिशाची होते आहे, सुशांतची होते आहे; कारण दोघेही सेलिब्रिटी होते. बाकीचे लोक सर्वसामान्यांच्या जगात वावरणारे होते, परंतु त्यांना बरेच काही माहित असले पाहिजे. मुलावर होणारे आरोप ही निव्वळ बदनामी आहे असे ठाकरेंना वाटत असेल, तर त्यांनी ‘होऊ द्या चौकशी’ अशी घोषणा केली पाहिजे. मुलाला नाईट लाईफचे इतके वेड का होते? दिनो मोरियाशी त्याचे काय संबंध आहेत? बालकांच्या लैंगिक शोषणाचे आरोप त्याच्यावर का होत आहेत? हे उघड होऊन जाईल. निधडी छातीच दाखवायची असेल तर ती मातोश्रीमध्ये पत्रकारांच्या समोर दाखवून काय फायदा? आदित्य ठाकरे यांचे ७ जून रोजीचे लोकेशन जाहीर करा. ‘माझा मुलगा ड्रग्ज घेत नाही, त्याची रक्तचाचणी करा आणि खात्री करा’, असे आव्हान द्या की ऍड. ओझांना! त्यांना सांगा, रक्तचाचणीचा अहवाल तुमच्या विरोधात गेला तर मातोश्रीसमोर नाक रगडून माफी मागा! ठाकरे हे करणार नाहीत.

वरुण सरदेसाई म्हणतायत, आम्ही आता असले आरोप सहन करणार नाही. सहन करणार नाही, मग काय करणार? पोकळ धमक्या कशाला देताय? ताकद असेल तर चौकशीला सामोरे जा, ७ जूनला कुठे होतात हे पुराव्यासह सिद्ध करा. सीबीआयला ते सांगावेच लागणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा