29 C
Mumbai
Thursday, September 24, 2026
घरराजकारणदिशा सालियनच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंना मातोश्रीवर जात दिली नोटीस

दिशा सालियनच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंना मातोश्रीवर जात दिली नोटीस

मातोश्रीबाहेर हायव्होल्टेज ड्रामा

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

मुंबईतील ‘मातोश्री’बाहेर शनिवारी दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून मोठा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन हे आपल्या वकिलांच्या टीमसह शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना कायदेशीर नोटीस देण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले. आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन प्रकरणासंदर्भात सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवर आक्षेप घेत सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. याच प्रकरणाशी संबंधित कायदेशीर नोटीस देण्यासाठी ते मातोश्रीवर पोहोचले होते.

मातोश्रीवर जाण्यापूर्वी सतीश सालियन यांनी माध्यमांशी संवाद साधताना आक्रमक भूमिका घेतली. “मला कोणीही कंट्रोल करू शकत नाही, फक्त देव मला कंट्रोल करू शकतो,” असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. गेल्या काही वर्षांपासून आपण या प्रकरणात न्यायासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगत, पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. आपल्या वकिलांची पूर्ण टीम सोबत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
हे ही वाचा:
ऐन विशीतच वाटले होते करिअर संपले, पण…

सौदीकडून भारताला तेलपुरवठा घटण्याची शक्यता

देशाची ऊर्जेची गरज भागविण्यासाठी आम्हाला सर्व पर्याय खुले!

तृणमूल काँग्रेसच्या नाव-चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात

दरम्यान, सतीश सालियन व त्यांच्या वकिलांची टीम मातोश्रीवर पोहोचल्याची माहिती मिळताच परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई हेही मातोश्रीवर दाखल झाले. आदित्य ठाकरे यांच्या वतीने अॅडव्होकेट राहुल दिवटे आणि अॅडव्होकेट अनिल जाधव हे नोटीस स्वीकारण्यासाठी मुख्य गेटवर उपस्थित होते. यावेळी मातोश्रीच्या बाहेर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी गेट बंद ठेवले होते, तर शिवसैनिकांनी सतीश सालियन यांना आत प्रवेश देण्यास विरोध केला. अखेर आदित्य ठाकरे यांच्याविरोधातील ५०० कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस त्यांच्या वकिलांनी स्वीकारली आणि नोटीस स्वीकारल्याची पावती सतीश सालियन यांच्या वकिलांना देण्यात आली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा