31 C
Mumbai
Wednesday, September 23, 2026
घरविशेषऐन विशीतच वाटले होते करिअर संपले, पण...

ऐन विशीतच वाटले होते करिअर संपले, पण…

अजित डोभाल यांनी गुप्तचर विभागातील सांगितली आठवण

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

सीमा भागातील एका मोहिमेवर गेलेले गुप्तचर पथक परतले नाही. दिवस उलटत गेले, मात्र त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळत नव्हती. अखेर मुख्यालयातून आलेल्या एका फोनने धक्कादायक माहिती मिळाली—हे कर्मचारी चिनी सैन्याच्या ताब्यात होते. पण त्यावेळी वाटले आता आपले करिअर संपले. नव्याने करिअरची सुरुवात करावी लागणार, अशा शब्दांत देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रुरकी येथील आयआयटी दीक्षांत समारंभात बोलताना जुन्या आठवणींना उजाळा दिला.

त्या वेळी सिक्कीममध्ये नियुक्त असलेले तरुण गुप्तचर अधिकारी अजित डोभाल यांच्यासाठी हा प्रसंग पथकाच्या सुरक्षेबरोबरच त्यांच्या स्वतःच्या व्यावसायिक भवितव्याबाबतही मोठी चिंता निर्माण करणारा होता.

विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की “मला माहीत होते की माझे करिअर इथेच संपले आहे. मी अजून विशीतच होतो आणि मला नव्याने करिअर सुरू करावे लागणार होते. डोवाल यांनी सांगितले की, ते त्या वेळी नुकतेच गुप्तचर क्षेत्रात दाखल झालेले तरुण आयपीएस अधिकारी होते. सिक्कीमचे भारतात विलीनीकरण होत असलेल्या काळात त्यांची सिक्कीममध्ये नियुक्ती झाली होती. त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये सीमेलगतच्या भागात चिनी लष्करी हालचालींबाबत गुप्तचर माहिती गोळा करणे याचाही समावेश होता.

ते म्हणाले की, सीमेवरील एका मोहिमेसाठी पाठवण्यात आलेले गुप्तचर पथक अपेक्षित वेळेत परतले नाही. त्यामुळे डोवाल अत्यंत चिंतेत पडले. ते म्हणाले, “माझ्यासाठी ही बाब केवळ व्यावसायिकदृष्ट्या नव्हे, तर मानवी दृष्टिकोनातूनही अत्यंत चिंतेची होती. एवढे लोक जिवंत आहेत की मृत, त्यांच्यासोबत नेमके काय झाले आहे, याची आम्हाला कोणतीही माहिती नव्हती.”

डोवाल यांच्या आठवणीनुसार, पथक बेपत्ता होण्यामागे संभाव्य कारण ठरेल अशी हिमस्खलनाची किंवा अन्य कोणत्याही दुर्घटनेची माहितीही मिळाली नव्हती. यानंतर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना हे पथक चिनी सैन्याच्या ताब्यात असल्याची माहिती दिली.

हे ही वाचा:

सौदीकडून भारताला तेलपुरवठा घटण्याची शक्यता

तृणमूल काँग्रेसच्या नाव-चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात

पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरच्या पर्यटनाला पुन्हा बहर

११ टन साहित्य घेऊन नेपाळसाठी नववे विमान रवाना

चिनच्या ताब्यातून पथकाची सुटका

या पथकाची चौकशी करण्यात आली आणि अखेर त्यांची सुटका करून त्यांना भारतात परत आणण्यात आले. त्यांची सुटका नेमक्या कोणत्या प्रक्रियेतून झाली, याबाबत डोवाल यांनी तपशील दिला नाही. मात्र, त्यासाठी चर्चा किंवा वाटाघाटी झाल्या असाव्यात, असे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर चौकशी सुरू झाली. या प्रकरणामुळे आपले करिअर संपेल, अशी भीती डोवाल यांना वाटत होती. मात्र, चौकशीत त्यांची कोणतीही चूक नसल्याचे स्पष्ट झाले.

डोवाल म्हणाले, “मुख्यालयाकडून आम्हाला देण्यात आलेल्या नकाशांमध्ये आणि स्केचमध्ये काही त्रुटी आणि चुका होत्या. त्यामुळेच ही घटना घडली.”

तुम्ही १,००० वर्षांतील भाग्यवान पिढी

दीक्षांत समारंभातील आपल्या भाषणात डोवाल यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पिढीसमोर उपलब्ध असलेल्या संधींचीही जाणीव करून दिली. ते म्हणाले, “गेल्या १,००० वर्षांमध्ये तुम्ही सर्वात भाग्यवान पिढी आहात, ज्यांच्यासमोर इतक्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत, याची कदाचित तुम्हाला जाणीव नसेल.”

पूर्वीच्या पिढ्यांनी गुलामगिरी आणि विविध प्रकारच्या बंधनांचा सामना केला. त्यामुळे त्यांच्या संधी मर्यादित होत्या, असे डोवाल यांनी सांगितले. मात्र, भारतासह संपूर्ण जगात झालेल्या बदलांमुळे आजच्या तरुणांसाठी नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. ते म्हणाले की, “तुम्ही अशा काळात आहात, जेव्हा तंत्रज्ञान कोणत्याही देशाच्या किंवा समाजाच्या विकास आणि प्रगतीचे सर्वात महत्त्वाचे प्रेरक घटक ठरणार आहे,” असे डोभाल यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा