32 C
Mumbai
Saturday, November 14, 2026
घरराजकारणदिल्ली विद्यापीठात अभाविपने जिंकल्या ४ पैकी ३ जागा, एनएसयूआयला शून्य

दिल्ली विद्यापीठात अभाविपने जिंकल्या ४ पैकी ३ जागा, एनएसयूआयला शून्य

अध्यक्ष, सचिव, सहसचिवपदावर मारली बाजी

Google News Follow

दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या (DUSU) २०२६ च्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) चे यश दाबस अध्यक्षपदी विजयी झाले आहेत. अपक्ष उमेदवार दीपांशू शोकीन यांनी उपाध्यक्षपद मिळवले आहे. तर अभाविपच्या रिया छावडी सचिवपदी आणि लक्ष्य राज सिंह संयुक्त सचिवपदी विजयी झाले आहेत.

या निवडणुकीत प्रमुख विद्यार्थी संघटनांमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली. ABVP, नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) आणि आयसा एसएफआय आघाडीने चार केंद्रीय पदांसाठी उमेदवार मैदानात उतरवले होते. याशिवाय अपक्ष तसेच इतर उमेदवारही महत्त्वाच्या पदांसाठी निवडणूक लढवत होते.

दिल्ली विद्यापीठाच्या उत्तर कॅम्पसमधील युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स स्टेडियमच्या मल्टिपर्पज हॉलमध्ये शनिवारी, १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विशेष चुरस पाहायला मिळाली. मतमोजणीच्या विविध फेऱ्यांमध्ये आघाडी वारंवार बदलत होती. त्यामुळे अंतिम निकालापर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले नव्हते.

हे ही वाचा:

‘चॅटजीपीटी’ प्रकरणातील IIT विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांत गुन्हा

२०० किलोचा लोखंडी खांब १३व्या मजल्यावरून पोलिस ठाण्याच्या छतावर कोसळला

लोखंडी गेट अंगावर कोसळून प्लंबरचा मृत्यू

पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरच्या पर्यटनाला पुन्हा बहर

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अभाविपचे यश डबास यांनी एनएसयूआयचे विजय मीणा यांचा पराभव केला. डबास यांना २४,५७६ मते, तर विजय मीणा यांना २२,५२३ मते मिळाली. डबास यांनी २,०५३ मतांनी विजय मिळवला. उपाध्यक्षपदावर अपक्ष उमेदवार दीपांशू शोकीन यांनी बाजी मारली. त्यांना ३०,६१५ मते मिळाली. अभाविपचे इशू मौर्य यांना १६,९१०, तर एनएसयूआयचे वीर छत्रथ यांना ४,३१३ मते मिळाली. शोकीन यांनी १३,७०५ मतांच्या फरकाने विजय मिळवला.

सचिवपदासाठी अभाविपच्या रिया छावडी यांनी एनएसयूआयच्या नम्रता चौधरी यांचा पराभव केला. रिया छावडी यांना २१,६५०, तर नम्रता चौधरी यांना १४,८६९ मते मिळाली. छावडी यांचा विजयाचा फरक ६,७८१ मतांचा राहिला.

संयुक्त सचिवपदावर अभाविपचे लक्ष्य राज सिंह विजयी झाले. त्यांना १६,६४१ मते मिळाली. अपक्ष उमेदवार विशेष यादव यांना १५,७७८, तर एनएसयूआय चे गोपाल चौधरी यांना १५,१०६ मते मिळाली. लक्ष्य राज सिंह यांनी ८६३ मतांनी विजय मिळवला.

अंतिम मताधिक्य

पद विजेता संघटना मते मताधिक्य
अध्यक्ष यश डबास अभाविप २४,५७६ २,०५३
उपाध्यक्ष दीपांशू शोकीन अपक्ष ३०,६१५ १३,७०५
सचिव रिया छावडी अभाविप २१,६५० ६,७८१
संयुक्त सचिव लक्ष्य राज सिंह अभाविप १६,६४१ ८६३

१.५१ लाखांहून अधिक विद्यार्थी मतदानासाठी पात्र

२०२६ च्या निवडणुकीत एकूण ४०.४६ टक्के मतदान झाले. दिल्ली विद्यापीठातील सर्व ५२ मतदान केंद्रांमधून मिळालेल्या मतदानाच्या आकडेवारीच्या आधारे हा मतदानाचा टक्का निश्चित करण्यात आला.

या निवडणुकीत १.५१ लाखांहून अधिक विद्यार्थी मतदानासाठी पात्र होते.

डे-कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारी सकाळी ८.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. तर इव्हिनिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी दुपारी ३ ते सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत मतदान केले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा