29 C
Mumbai
Saturday, September 26, 2026
घरविशेषजंगल वॉरफेअर ते ड्रोन वॉरफेअर; भारत-अमेरिकेच्या जवानांचा युद्धसराव

जंगल वॉरफेअर ते ड्रोन वॉरफेअर; भारत-अमेरिकेच्या जवानांचा युद्धसराव

उत्तराखंडच्या औली येथे ‘युद्ध अभ्यास २०२६’ सुरू

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

भारत आणि अमेरिकेच्या लष्करांमध्ये उत्तराखंडच्या औली येथे सुरू असलेल्या ‘युद्ध अभ्यास २०२६’ या संयुक्त लष्करी सरावात दोन्ही देशांच्या जवानांनी विविध युद्धकौशल्यांचा सराव केला. जंगल वॉरफेअर, इनडोअर फायरिंग, रॅपलिंग तसेच जवळच्या अंतरावरील कारवायांचा या सरावात समावेश आहे. भारत-अमेरिका लष्करांमधील हा संयुक्त सराव १५ सप्टेंबरपासून सुरू असून त्याची २८ सप्टेंबरला सांगता होणार आहे.

‘युद्ध अभ्यास २०२६’ची ही २२वी आवृत्ती आहे. या सरावात भारत आणि अमेरिकेचे प्रत्येकी सुमारे ६०० जवान सहभागी झाले आहेत. उत्तराखंडमधील औली फॉरेन ट्रेनिंग नोड आणि राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज येथे हा सराव एकाच वेळी सुरू आहे. पर्वतीय आणि निम-पर्वतीय भागात एकत्रित लष्करी कारवाया करण्याची क्षमता वाढवणे हा या सरावाचा प्रमुख उद्देश आहे.

औलीच्या डोंगराळ आणि वनक्षेत्रात भारतीय व अमेरिकी जवानांनी जंगलातील लढाईचे प्रशिक्षण घेतले. प्रतिकूल भूभागात हालचाल, लहान पथकांमधील समन्वय आणि लक्ष्यावर कारवाई यांचा सराव करण्यात आला. यासोबतच जवानांनी उंच आणि खडकाळ भागात रॅपलिंग ड्रिलही केली. या प्रशिक्षणाचा उद्देश उच्च उंचीच्या आणि आव्हानात्मक पर्वतीय भागात संयुक्तपणे लष्करी कारवाई करण्यासाठी आवश्यक कौशल्यांचा सराव करणे हा आहे. ‘युद्ध अभ्यास’मध्ये पर्वतीय युद्ध आणि थंड हवामानातील लष्करी कारवायांवरही विशेष भर देण्यात आला आहे.

सरावादरम्यान दोन्ही देशांच्या जवानांनी बिल्डिंग क्लिअरन्स आणि रूम इंटरव्हेन्शन ड्रिलही केली. जवळच्या अंतरावरील दहशतवादविरोधी कारवायांची प्रतिकृती तयार करून ही ट्रेनिंग करण्यात आली. या ड्रिलमध्ये ड्रोन, रोबोटिक डॉग्स, प्रशिक्षित लष्करी श्वान आणि स्नायपर पथकांचा समन्वय साधण्यात आला. भारतीय लष्कराच्या प्रशिक्षित श्वानांनी रूम इंटरव्हेन्शन आणि रॅपलिंगसारख्या सरावांमध्येही सहभाग घेतला.

हे ही वाचा:

आयआयटी मुंबईचे प्रा. डूल्ला अधिष्ठातापदावरून निलंबित

गणेश अन्नदानाच्या ठिकाणी हाडे-मांसाचा कचरा; तीन जण ताब्यात

“गणवेश नको, सेवा सुधारा!” पीआयएच्या नव्या गणवेशावरून वाद

मागण्या पूर्ण होईपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणार नाही!

यंदाच्या ‘युद्ध अभ्यास’मध्ये पारंपरिक युद्धकौशल्यांसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा महत्त्वाचा भाग आहे. ड्रोन आणि स्वायत्त प्रणालींच्या मदतीने निगराणी आणि टेहळणी करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच बहुआयामी युद्धपद्धती, प्रतिड्रोन कारवाई आणि आधुनिक शस्त्रप्रणाली यावर दोन्ही देशांच्या लष्करी तज्ज्ञांमध्ये विचारांची देवाणघेवाण होत आहे. राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये आधुनिक शस्त्रप्रणालींच्या प्रत्यक्ष सरावाचाही समावेश आहे. यामध्ये HIMARS, Stinger आणि M-LIDS यांसारख्या प्रणालींच्या लाइव्ह-फायर प्रशिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा