27 C
Mumbai
Thursday, October 1, 2026
घरबिजनेसदसऱ्यापासून भारतीय उत्पादने न्यूझीलंडमध्ये ‘शुल्कमुक्त’!

दसऱ्यापासून भारतीय उत्पादने न्यूझीलंडमध्ये ‘शुल्कमुक्त’!

भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करार होणार लागू

Google News Follow

Related

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मुक्त व्यापार करार म्हणजेच फ्री ट्रेड ऍग्रीमेंट (FTA) येत्या २० ऑक्टोबरपासून, दसऱ्याच्या दिवशी लागू होणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी (२१ सप्टेंबर) ही माहिती दिली. या करारामुळे न्यूझीलंडच्या बाजारपेठेत भारतीय निर्यातीच्या १०० टक्के उत्पादनांना शुल्कमुक्त प्रवेश मिळणार आहे.

भारत आणि न्यूझीलंडने द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी २७ एप्रिल २०२६ रोजी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. दोन्ही देशांमधील वस्तू आणि सेवांच्या व्यापाराला गती देण्यासोबतच गुंतवणुकीच्या संधी वाढवणे हा या कराराचा प्रमुख उद्देश आहे. या करारानुसार न्यूझीलंडमध्ये भारतीय निर्यातीच्या सर्व टॅरिफ लाइन्सना शुल्कमुक्त प्रवेश मिळणार आहे. याचा फायदा कापड आणि तयार कपडे, चामडे व पादत्राणे, अभियांत्रिकी वस्तू, औषधनिर्मिती, कृषी उत्पादने आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ यांसारख्या क्षेत्रांना होण्याची अपेक्षा आहे.

सध्या न्यूझीलंडकडून काही प्रमुख भारतीय उत्पादनांवर १० टक्क्यांपर्यंत शुल्क आकारले जाते. यात सिरॅमिक्स, कार्पेट, ऑटोमोबाइल आणि ऑटो पार्ट्स यांसारख्या उत्पादनांचा समावेश आहे. करार लागू झाल्यानंतर या शुल्करचनेत बदल होऊन भारतीय निर्यातदारांना न्यूझीलंडच्या बाजारपेठेत अधिक अनुकूल प्रवेश मिळणार आहे. या व्यापार करारातील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे न्यूझीलंडने भारतात १५ वर्षांच्या कालावधीत २० अब्ज अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीची बांधिलकी व्यक्त केली आहे. या गुंतवणुकीमुळे भारतातील उद्योग, व्यवसाय आणि विविध आर्थिक क्षेत्रांना संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

हे ही वाचा:

जंगल वॉरफेअर ते ड्रोन वॉरफेअर; भारत-अमेरिकेच्या जवानांचा युद्धसराव

आयआयटी मुंबईचे प्रा. डूल्ला अधिष्ठातापदावरून निलंबित

गणेश अन्नदानाच्या ठिकाणी हाडे-मांसाचा कचरा; तीन जण ताब्यात

“गणवेश नको, सेवा सुधारा!” पीआयएच्या नव्या गणवेशावरून वाद

मुक्त व्यापार करारामुळे भारतीय निर्यातीला न्यूझीलंडमध्ये शुल्कमुक्त प्रवेश मिळत असताना न्यूझीलंडच्या काही उत्पादनांना भारतीय बाजारपेठेत वाढीव आणि प्राधान्यक्रमाचा प्रवेश मिळणार आहे. यामध्ये लाकूड, लोकर, मेंढीचे मांस आणि कच्चे चामडे यांचा समावेश आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा