38 C
Mumbai
Tuesday, October 13, 2026
घरदेश दुनियामागण्या पूर्ण होईपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणार नाही!

मागण्या पूर्ण होईपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणार नाही!

अमेरिकेसमोर इराणच्या अटी

Google News Follow

Related

अमेरिका आणि इराणमधील तणाव शमण्याची चिन्हे दिसत नसून इराणने अमेरिकेसोबत पुन्हा चर्चेच्या टेबलावर बसण्यास नकार दिला आहे. यासोबतच जगातील महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक असलेली होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासही स्पष्ट नकार दिला आहे. अमेरिकेने इराणच्या अटी मान्य केल्याशिवाय आणि आपली आश्वासने पूर्ण केल्याशिवाय चर्चेच्या पूर्वीच्या चौकटीत परतण्याचा प्रश्नच नाही, असे इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनी स्पष्ट केले आहे.

गालिबाफ यांच्या म्हणण्यानुसार, इराणने मध्यस्थांच्या माध्यमातून आपल्या मागण्या अमेरिकेपर्यंत स्पष्टपणे पोहोचवल्या आहेत. या मागण्या पूर्ण होईपर्यंत इराण आपल्या भूमिकेत कोणताही बदल करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. इराणचे सुरक्षा प्रमुख मोहसेन रेजाई यांनी यापूर्वी कतारच्या मध्यस्थीमार्फत अमेरिकेसमोर संघर्ष संपवण्यासाठी काही अटी ठेवल्या होत्या. त्यामध्ये सर्व आघाड्यांवरील युद्ध थांबवणे, इराणची गोठवलेली अब्जावधी डॉलरची रक्कम मुक्त करणे आणि इराणवरील सागरी नाकेबंदी उठवणे यांचा समावेश आहे. याशिवाय इराणने आपल्या अंतर्गत कारभारात अमेरिकेने हस्तक्षेप करू नये, इराणविरोधी गटांना अमेरिकेने सहकार्य करू नये आणि इराणच्या भूभागावर अमेरिकेने हल्ले थांबवावेत, अशाही मागण्या केल्या आहेत.

होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील महत्त्वाच्या ऊर्जा वाहतूक मार्गांपैकी एक आहे. आखाती देशांमधून होणाऱ्या तेल वाहतुकीसाठी या मार्गाचे मोठे महत्त्व आहे. त्यामुळे या सामुद्रधुनीतील वाहतुकीवर निर्बंध आल्याने आंतरराष्ट्रीय व्यापार आणि तेलपुरवठ्यावर परिणाम होण्याची चिंता वाढली आहे. मात्र, इराणने या मार्गाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमेरिकेने इराणच्या अटी मान्य केल्याशिवाय आणि आपली आश्वासने पूर्ण केल्याशिवाय होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली जाणार नाही, असे गालिबाफ यांनी सांगितले.

हे ही वाचा:

विखे पाटील घराण्याची लेक स्वीडनच्या संसदेत

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाची बांगलादेशवर मात

झारखंडचा ३० लाखांचे इनाम असलेला नक्षली ब्रजेश गंझूचे वाराणसीत एन्काऊंटर

कोस्टल रोडवरून खाली कोसळली भरधाव बीएमडब्ल्यू; तिघे मृत्युमुखी

इराणने अमेरिकेला लष्करी कारवाईबाबतही गंभीर इशारा दिला आहे. अमेरिकेने इराणविरोधात पुन्हा लष्करी कारवाई केल्यास मध्यपूर्वेतील अमेरिकेच्या तळांवर आणि हितसंबंधांवर हल्ले केले जातील, असे इराणच्या केंद्रीय लष्करी नेतृत्वाकडून सांगण्यात आले आहे. तसेच अमेरिकेच्या कोणत्याही लष्करी कारवाईला मदत करणाऱ्या प्रादेशिक देशांनाही या संघर्षातील सहभागी मानले जाईल, असा इशाराही इराणने दिला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा