29 C
Mumbai
Thursday, September 24, 2026
घरक्राईमनामाथारच्या चेसिसपासून कंबरेच्या पट्ट्यापर्यंत; ३२ कोटींचे सोने जप्त

थारच्या चेसिसपासून कंबरेच्या पट्ट्यापर्यंत; ३२ कोटींचे सोने जप्त

डीआरआयची मोठी कारवाई

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

परदेशातून भारतात आणले जाणारे तस्करीचे सोने पकडण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मोठी कारवाई केली आहे. दोन स्वतंत्र कारवायांमध्ये २०.९८ किलो परदेशी बनावटीचे सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे ३२ कोटी रुपये आहे. या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी पलवल टोल प्लाझाजवळ दोन नवीन थार गाड्या अडवल्या. या दोन्ही वाहनांच्या चेसिसमध्ये मागील चाकाजवळ विशेष पद्धतीने गुप्त कप्पा तयार करण्यात आला होता. चेसिसचा एक भाग कापून पुन्हा वेल्डिंग करण्यात आल्याने हा कप्पा सहजपणे लक्षात येत नव्हता. मात्र, अधिकाऱ्यांनी वाहनांची बारकाईने तपासणी केल्यानंतर हा गुप्त कप्पा शोधून काढला. या दोन्ही वाहनांमधून १५.१८ किलो सोन्याच्या लगडी (कांडी किंवा ढेप) जप्त करण्यात आल्या. या सोन्याची किंमत सुमारे २३.३० कोटी रुपये असल्याचे डीआरआयने सांगितले. ही कारवाई १९ सप्टेंबरला करण्यात आली असून, वाहनांमध्ये असलेल्या चार जणांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक गुप्त माहितीनुसार हे सोने म्यानमारमधून तस्करी करून भारतात आणण्यात आल्याचा संशय आहे.

यापूर्वी १६ सप्टेंबरला डीआरआयने जेवर टोल प्लाझाजवळ एका प्रवाशाला अडवले होते. हा प्रवासी गोरखपूरहून दिल्लीकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास करत होता. त्याची झडती घेतली असता ५.८ किलो परदेशी बनावटीचे सोने आढळले. या सोन्यामध्ये १ किलो वजनाच्या पाच सोन्याच्या लगडी आणि सुमारे ८०० ग्रॅम सोन्याचे तुकडे होते. विशेष म्हणजे, हे सोने एका खास पद्धतीने तयार केलेल्या कापडी कंबरेच्या पट्ट्यात लपवण्यात आले होते. या प्रकरणात संबंधित व्यक्तीला सीमाशुल्क कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासानुसार, त्याला हे सोने काठमांडूमध्ये देण्यात आले होते आणि त्यानंतर भारत-नेपाळच्या स्थलसीमेवरून ते भारतात आणण्यात आले.

हे ही वाचा:

पाकिस्तानचे अफगाणिस्तानवर ड्रोन हल्ले

‘धुरंधर’ने बदलला लडाखच्या पर्यटनाचा चेहरा

जगातील संघर्ष सोडवण्यात आंतरराष्ट्रीय व्यवस्था अपयशी

ग्रेटर नोएडात धावत्या स्लीपर बसला आग लागून नऊ जणांचा मृत्यू

तीन आठवड्यांत १२३ किलो सोने जप्त

दरम्यान, गेल्या तीन आठवड्यांत डीआरआयने देशभरात केलेल्या विविध कारवायांमध्ये सुमारे १२३ किलो सोने आणि १० किलो चांदी जप्त केली आहे. या जप्त मालाची एकूण किंमत १८७ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. सोने तस्करीच्या प्रकरणांमध्ये आतापर्यंत ५८ जणांना अटक करण्यात आली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा