28.2 C
Mumbai
Thursday, October 15, 2026
घरविशेष‘धुरंधर’ने बदलला लडाखच्या पर्यटनाचा चेहरा

‘धुरंधर’ने बदलला लडाखच्या पर्यटनाचा चेहरा

पडद्यावरची ठिकाणे बनली पर्यटकांची नवी डेस्टिनेशन्स

Google News Follow

Related

एखाद्या चित्रपटातील एखादे ठिकाण प्रेक्षकांच्या लक्षात राहते आणि चित्रपट संपल्यानंतरही त्याची उत्सुकता कायम राहते. मात्र, हीच उत्सुकता जेव्हा प्रेक्षकांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष घेऊन जाते, तेव्हा चित्रपट पर्यटनाला नवी दिशा मिळते. अभिनेता रणवीर सिंह आणि दिग्दर्शक आदित्य धर यांच्या ‘धुरंधर’ चित्रपटाच्या बाबतीत सध्या असेच काहीसे पाहायला मिळत आहे. चित्रपटातील दृश्यांमुळे लडाखमधील काही ठिकाणांना आता पर्यटक आणि चाहत्यांकडून विशेष पसंती मिळत आहे. चित्रपटात दिसलेली ठिकाणे प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि तिथे चित्रपटातील प्रसंग पुन्हा साकारण्यासाठी चाहते लडाखला भेट देत आहेत.

‘धुरंधर’मध्ये पाकिस्तानातील लियारी परिसरातील चहाच्या दुकानाच्या रूपात दाखवण्यात आलेले ‘वाशमा बट’ हे ठिकाण प्रत्यक्षात लेहमधील एका कॅफेमध्ये चित्रित करण्यात आले होते. रणवीर सिंहचा हमजा आणि गौरव गेराचा आलम या पात्रांमधील काही महत्त्वाचे संवाद याच ठिकाणी चित्रित करण्यात आले होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या ठिकाणाची ओळख बदलली. पूर्वी SH Khan Restaurant म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण आता ‘वाशमा बट’ आणि ‘धुरंधर कॅफे’ या नावांनी पर्यटकांमध्ये लोकप्रिय झाले आहे. चित्रपट पाहिल्यानंतर लडाखला येणारे अनेक चाहते या कॅफेला आपल्या प्रवासाच्या यादीत आवर्जून समाविष्ट करत आहेत. कॅफेच्या मालकाच्या म्हणण्यानुसार, आता देशभरातून पर्यटक येथे येत असून, हे ठिकाण एक प्रकारचे साइटसीइंग स्पॉट बनले आहे.

या कॅफेची खासियत केवळ चित्रपटात ते दिसले इतकीच राहिलेली नाही. चाहत्यांना चित्रपटातील अनुभव प्रत्यक्ष घेता यावा, यासाठी कॅफेमधील काही भाग तसाच ठेवण्यात आला आहे. हिरव्या रंगाच्या भिंती, चित्रपटातील पोस्टर्स आणि रणवीर सिंह व गौरव गेरा यांच्या पात्रांचे मोठे म्युरल यामुळे चाहत्यांना चित्रपटातील वातावरणाचा अनुभव घेता येतो. विशेष म्हणजे, पर्यटक येथे हमजा आणि आलमच्या लूकमध्ये फोटो आणि रील्स बनवत आहेत. कॅफेमध्ये या पात्रांपासून प्रेरित कपडे आणि विगही उपलब्ध आहेत. केवळ फोटो काढण्यासाठी किंवा चित्रपटातील अनुभव घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून ५० रुपये शुल्क घेतले जाते.

हे ही वाचा:

जगातील संघर्ष सोडवण्यात आंतरराष्ट्रीय व्यवस्था अपयशी

ग्रेटर नोएडात धावत्या स्लीपर बसला आग लागून नऊ जणांचा मृत्यू

स्वदेशी एसीव्ही एच-५६२ तटरक्षक दलाच्या ताफ्यात

हमासचा अर्थविभाग प्रमुख मोहम्मद अबू अलवानला इस्रायलने टिपले

‘धुरंधर’मुळे संगम पॉइंटही चर्चेत

‘धुरंधर’च्या प्रसिद्धीचा परिणाम केवळ या कॅफेपुरता मर्यादित नाही. चित्रपटातील ‘गहरा हुआ’ या गाण्यात दिसलेला लडाखमधील संगम पॉइंटही चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाला आहे. सिंधू आणि झांस्कर नद्यांचा संगम असलेल्या या निसर्गरम्य ठिकाणी चित्रपटातील दृश्यांची झलक पाहिल्यानंतर अनेक पर्यटक आणि विशेषतः कपल्स तेथे जाऊन त्याच धाटणीचे फोटो आणि व्हिडीओ तयार करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा