32 C
Mumbai
Wednesday, September 30, 2026
घरदेश दुनियाहमासचा अर्थविभाग प्रमुख मोहम्मद अबू अलवानला इस्रायलने टिपले

हमासचा अर्थविभाग प्रमुख मोहम्मद अबू अलवानला इस्रायलने टिपले

खान युनिसमध्ये केली कारवाई

Google News Follow

Related

इस्रायल आणि हमास यांच्यात अद्याप संघर्ष सुरू असून इस्रायलने केलेल्या कारवाईत हमासच्या बड्या नेत्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण गाझातील खान युनिस येथे हमासच्या अर्थ विभागाचा प्रमुख मोहम्मद अबू अलवान ठार झाल्याचा दावा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि संरक्षणमंत्री इस्रायल कात्झ यांनी केला आहे. ही कारवाई इस्रायल संरक्षण दल (IDF) आणि इस्रायल सिक्युरिटी एजन्सी (ISA) यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आल्याचे इस्रायली पंतप्रधान कार्यालयाने सांगितले.

इस्रायलच्या पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांनी संयुक्त निवेदन जारी करत या कारवाईची माहिती दिली. खान युनिसमध्ये करण्यात आलेल्या लक्ष्यित हल्ल्यात हमासच्या वित्त विभागाचा प्रमुख मोहम्मद अबू अलवान मारला गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. हमासच्या नेतृत्वावर आणि त्याच्या आर्थिक स्रोतांवर कारवाई सुरूच ठेवण्याचा निर्धारही इस्रायलने व्यक्त केला आहे.

दरम्यान, खान युनिसच्या पश्चिम भागात एका वाहनावर झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यात दोन जण ठार झाल्याची माहिती स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यापैकी मोहम्मद अबू अलवान आणि ओसामा अबू खातेर अशी नावे सांगण्यात आली असून, आणखी दोन जण जखमी झाल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. इस्रायलने या हल्ल्याचे लक्ष्य हमासचा आर्थिक प्रमुख असल्याचे सांगितले आहे.

हे ही वाचा:

भाजपची नवी मोर्चेबांधणी; महाराष्ट्रातील नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी

दोन दिवसांत दुष्काळ जाहीर करणार

सिंधू जल करार प्रकरणात पाकिस्तानचा लवादच बेकायदेशीर

काश्मीर प्रश्नात एर्दोगान यांची पुन्हा लुडबूड

इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू आणि संरक्षणमंत्री कात्झ यांनी हमासच्या कमांडर आणि कार्यकर्त्यांचा पाठलाग सुरू ठेवण्याबरोबरच संघटनेच्या आर्थिक स्रोतांवर कारवाई आणि त्याच्या पायाभूत सुविधांचा नाश करण्याची भूमिका मांडली आहे. गाझामध्ये हमासला पुन्हा संघटित होऊ दिले जाणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा