28.9 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरराजकारण“नग्न व्यक्ती नृत्य करतो आणि नंतर म्हणतो की कपडे फाटले”

“नग्न व्यक्ती नृत्य करतो आणि नंतर म्हणतो की कपडे फाटले”

राहुल गांधीच्या आरोपावर भाजपाचे जोरदार पलटवार

Google News Follow

निवडणूक आयोग आणि कथित ‘वोटचोरी’च्या आरोपांवरून काँग्रेस आणि भाजपमधील राजकीय संघर्ष आता चांगलाच पेटला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाल्याचा दावा करत राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ‘वोटचोरी’चा मुद्दा पुढे आणला. त्यांच्या या आरोपांवर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार पलटवार केला.

राहुल गांधींच्या भूमिकेवर टीका करताना त्रिवेदी यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांचा वापर केला. “नग्न व्यक्ती नृत्य करतो आणि नंतर म्हणते की कपडा फाटला,” अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधींवर तंज कसला. निवडणूक हरल्यानंतर संपूर्ण प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित करण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचा आरोप करत, आधी स्वतःच्या राजकीय कामगिरीकडे पाहावे, असा टोला त्यांनी लगावला.

हे ही वाचा:
अॅन्टी-इन्कम्बन्सी गेली कुठे?

काँग्रेसची परंपरा तुरुंगात पाठवण्याची नसून प्रमोशन देण्याची आहे

समस्तीपूरमध्ये तरुणीशी गैरवर्तनाचा धक्कादायक प्रकार

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

राहुल गांधी यांनी भाजपच्या सलग विजयांवरही प्रश्न उपस्थित केला होता. देशात सत्ताविरोधी लाट असते, मग भाजपला त्याचा फटका का बसत नाही, असा सवाल त्यांनी केला. यावर त्रिवेदी यांनी काँग्रेसच्या निवडणूक इतिहासाचा दाखला देत राहुल गांधींनाच प्रतिप्रश्न केला. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला दीर्घकाळ सत्ता मिळालेली नाही. त्यामुळे अँटी-इन्कम्बन्सीचा मुद्दा केवळ भाजपच्या विजयांशी जोडणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

याचवेळी निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरही भाजपने आक्षेप घेतला. राहुल गांधी पुरावे असल्याचा दावा करत असले, तरी त्यांच्या आरोपांवर निवडणूक आयोगाची बाजू आणि उपलब्ध अधिकृत माहितीही महत्त्वाची ठरते. त्यामुळे ‘वोटचोरी’चा आरोप आणि त्यावरील भाजपचा प्रतिवाद यामध्ये आता थेट राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे.

राहुल गांधींच्या आरोपांनंतर भाजपने बचावात्मक भूमिका न घेता थेट काँग्रेसच्या राजकीय इतिहासावर हल्ला चढवला आहे. ‘निवडणूक हरली की आयोग दोषी आणि जिंकली की व्यवस्था योग्य’, असा सवाल उपस्थित करत त्रिवेदी यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर निशाणा साधला. त्यामुळे निवडणूक आयोग, ‘वोटचोरी’ आणि अँटी-इन्कम्बन्सीचा मुद्दा आगामी राजकीय संघर्षात आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा