30.3 C
Mumbai
Friday, October 16, 2026
घरदेश दुनिया११ वर्षांनंतर शी जिनपिंग अमेरिकेत

११ वर्षांनंतर शी जिनपिंग अमेरिकेत

ट्रम्प यांनी विमानतळावरच केले स्वागत

Google News Follow

Related

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग तब्बल ११ वर्षांनंतर अमेरिकेच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वतः जॉइंट बेस अँड्र्यूज येथे उपस्थित होते. ट्रम्प यांनी जिनपिंग यांचे औपचारिक स्वागत केले. या भेटीमुळे अमेरिका आणि चीनमधील संबंध पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. जिनपिंग यांच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यात महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा होणार आहे.

व्यापार आणि टॅरिफच्या मुद्द्यांसोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान, तैवान आणि इराणमधील परिस्थिती यांसारख्या संवेदनशील विषयांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. जिनपिंग यांच्या स्वागतासाठी अमेरिकेत विशेष राजकीय आणि राजनैतिक तयारी करण्यात आली आहे. व्हाइट हाऊसमध्ये जिनपिंग यांचे औपचारिक स्वागत झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार असून, त्यांच्या सन्मानार्थ स्टेट डिनरचेही आयोजन करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
“नग्न व्यक्ती नृत्य करतो आणि नंतर म्हणतो की कपडे फाटले”

अॅन्टी-इन्कम्बन्सी गेली कुठे?

काँग्रेसची परंपरा तुरुंगात पाठवण्याची नसून प्रमोशन देण्याची आहे

विद्यार्थ्यांना सोडून ‘कॉक्रोच’ निवडणूक आयुक्तांच्या मागे

अमेरिका आणि चीन हे जगातील दोन प्रमुख आर्थिक आणि सामरिक शक्ती असल्याने या भेटीकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले आहे. व्यापारयुद्ध, तंत्रज्ञानातील स्पर्धा आणि भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प-जिनपिंग यांच्यातील चर्चेतून कोणते संकेत मिळतात, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा