29 C
Mumbai
Friday, October 23, 2026
घरविशेषआधीच मर्कट त्यात मद्य प्याला...म्हण खरी ठरली!

आधीच मर्कट त्यात मद्य प्याला…म्हण खरी ठरली!

Google News Follow

आधीच मर्कट त्यात मद्य प्याला ही म्हण प्रचलित आहे. त्या म्हणीची प्रचिती झारखंडमध्ये आली. आधीच खोडकर असलेली व्यक्ती मद्य प्यायल्यावर बेभान होते, असा त्या म्हणीचा अर्थ आहे. झारखंडची राजधानी रांची येथे एक धक्कादायक आणि विचित्र घटना समोर आली आहे. शुक्रवारी ओरमांझी येथील ब्लॉक चौक परिसरातील एका दारूच्या दुकानात अचानक एक माकड शिरले. दुकानात प्रवेश केल्यानंतर माकडाने असे काही केले की, ते पाहून दुकानातील उपस्थित लोकही आश्चर्यचकित झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, दुकानात शिरल्यानंतर माकडाने तेथे ठेवलेल्या दारूच्या बाटलीतून दारू प्यायली. त्यानंतर ते नशेत गेले आणि काही वेळाने दुकानातच झोपी गेले. माकड दारूच्या दुकानात शिरल्याची माहिती परिसरात पसरताच दुकानाबाहेर मोठी गर्दी जमा झाली. माकडाला पाहण्यासाठी लोकांची उत्सुकता वाढली.

माकड अचानक दुकानात शिरल्याने सुरुवातीला दुकानातील लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. दुकानदाराने माकडाला दुकानाबाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, माकडाने दुकानदाराला चावा घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दुकानदाराला मागे हटावे लागले. यानंतर माकडाने दुकानात ठेवलेल्या दारूच्या बाटलीतून दारू प्यायली. दारू प्यायल्यानंतर ते दुकानातच आरामात पडले आणि काही वेळात झोपी गेले.

हे ही वाचा:

भारताचा कबड्डीत पुन्हा सुवर्णविजय!

इस्लामाबाद सील! रस्त्यांवर कंटेनर, लोखंडी काटे अन् २२ हजार सुरक्षारक्षक

नागालँडमध्ये बनावट दारूच्या सेवनानंतर १९ जण दगावले

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर

माकडाच्या या विचित्र प्रकाराची बातमी परिसरात वेगाने पसरली. त्यानंतर दुकानाजवळ मोठ्या संख्येने लोक जमा झाले. माकडाची ही विचित्र अवस्था प्रत्यक्ष पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक होता. घटनास्थळी उपस्थित लोकांमध्ये माकडाच्या वर्तनाचीच चर्चा सुरू होती. माकड दुकानातच झोपल्याची माहिती मिळाल्यानंतर बचाव पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. बचाव पथक तेथे पोहोचल्यानंतर माकडाला कोणतीही इजा न करता सुरक्षितपणे दुकानाबाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.

अखेर बचाव पथकाने माकडाला दुकानातून बाहेर काढले आणि त्याला सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. या घटनेमुळे परिसरात काही काळ मोठी गर्दी झाली होती. माकडाने दारू प्यायल्याचा दावा करण्यात आला असला, तरी या घटनेमागील नेमकी परिस्थिती आणि माकडाने किती प्रमाणात दारू प्यायली याबाबत स्वतंत्र अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा