36 C
Mumbai
Tuesday, October 13, 2026
घरविशेषतृणमूल आमदार कुणाल घोष यांच्या गाडीवर फेकली अंडी

तृणमूल आमदार कुणाल घोष यांच्या गाडीवर फेकली अंडी

ममता यांच्या सभेला जात असताना हल्ला

Google News Follow

Related

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) आमदार कुणाल घोष यांच्या गाडीवर दगड आणि अंडी फेकल्याची घटना समोर आली आहे. ममता बॅनर्जी यांच्या सभेला जाण्यासाठी घोष हे हुगळी जिल्ह्यातील सेरामपूरकडे जात असताना उत्तरपाडा परिसरात हा प्रकार घडला. या घटनेत त्यांच्या गाडीची मागील काच फुटली. घोष यांनी त्यानंतर कोलकात्याकडे परतण्याचा निर्णय घेतला.

माहितीनुसार, काही लोकांनी काळे झेंडे घेऊन कुणाल घोष यांच्या गाडीला घेराव घातला आणि घोष यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर गाडीवर अंडी आणि दगड फेकण्यात आले. या घटनेचे व्हिडीओही समोर आले आहेत. व्हिडीओमध्ये काही लोक गाडीभोवती उभे राहून घोषणाबाजी करताना आणि गाडीवर हल्ला करताना दिसत आहेत.

कुणाल घोष यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना, त्यांच्या गाडीवर दगड आणि अंडी फेकण्यात आल्याचा आरोप केला. तसेच रस्ता अडवण्यात आला आणि त्यावेळी घटनास्थळी पोलीस उपस्थित नव्हते, असा दावा त्यांनी केला. या घटनेनंतर तक्रार दाखल करण्यासाठी कोलकात्यात परत जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्यापासून, तृणमूलच्या नेत्यांवर अंडी आणि दगडफेकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. ममता बॅनर्जी, यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी आणि कुणाल घोष यांच्यासह अनेक तृणमूलचे नेते याचे बळी ठरले आहेत. सोनारपूरमध्ये तृणमूलचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या ताफ्यावर दगड, अंडी आणि चपला फेकण्यात आल्या होत्या, ज्यामुळे त्यांना हेल्मेट घालून घटनास्थळावरून निघून जावे लागले होते.

हे ही वाचा:

नागालँडमध्ये बनावट दारूच्या सेवनानंतर १९ जण दगावले

‘लालबागच्या राजा’ला भावपूर्ण निरोप!

जम्मू-काश्मीर विधानसभेत राडा; भाजप आमदाराला काढले बाहेर

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर

यानंतर दमदमचे खासदार सौगता रॉय निमटा पोलीस ठाण्यातून बाहेर पडत असताना आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर अंडी फेकली होती. कामरहाटीचे आमदार मदन मित्रा यांच्या गाडीवर अंडी फेकण्यात आली होती आणि गाडीची तोडफोड करण्यात आली होती. कुणाल घोष यांच्यावर यापूर्वीही अंड्याने हल्ला झाला होता. कालीघाटमध्ये ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानाबाहेर माध्यमांशी बोलत असताना आमदार कुणाल घोष यांच्यावर हल्ला झाला होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा