30 C
Mumbai
Tuesday, October 6, 2026
घरक्राईमनामारील करून सोन्याचे दागिने दाखविण्याची हौस महिलेला पडली महागात

रील करून सोन्याचे दागिने दाखविण्याची हौस महिलेला पडली महागात

चोरांनी केली घराची 'सफाई'

Google News Follow

Related

सोशल मीडियावर सोन्याचे दागिने आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम दाखवण्यासाठी कन्याकुमारीतील एका यूट्यूबरने रील बनवले पण तिला हे चांगलेच महागात पडले. चोराने रील बघून तिच्या घरातच डल्ला मारला. चोरट्यांनी नागरकोईलजवळील त्याच्या घरात घुसून तब्बल ११८ सॉव्हरिन म्हणजेच सुमारे ९४४ ग्रॅम सोने आणि रोख रक्कम लंपास केली.

ही चोरी थम्मथुकोणम येथील व्हीआयपी गार्डन परिसरात घडली. येथे यूट्यूबर विनोद कुमार हे पत्नी मधुमिता यांच्यासोबत राहतात. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील मौल्यवान वस्तू आणि सोने घेऊन चोरटे पसार झाले.

घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर राजक्कमंगलम पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी घरातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी चोरीपूर्वी आणि चोरीनंतर त्यांच्या हालचालींचा तपास केला जात आहे.

हे ही वाचा:

तृणमूल आमदार कुणाल घोष यांच्या गाडीवर फेकली अंडी

भारताच्या पुरुष कबड्डी संघाची पुन्हा सुवर्णभरारी!

विराटचा शेवटचा वर्ल्ड कप; भारतासाठी सर्वस्व पणाला लावणार!

नागालँडमध्ये बनावट दारूच्या सेवनानंतर १९ जण दगावले

चोरट्यांनी परिसरात नेमका कसा प्रवेश केला आणि त्यांच्या हालचाली जवळपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाल्या आहेत का, याचाही पोलीस शोध घेत आहेत.

सोशल मीडिया पोस्टचीही तपासणी

या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांकडून यूट्यूबर दाम्पत्याच्या सोशल मीडिया पोस्ट आणि व्हिडिओंचीही तपासणी केली जात आहे. विनोद कुमार आणि त्यांच्या पत्नीच्या सोशल मीडिया व्हिडिओंमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम दाखवण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून घरात ठेवलेल्या मौल्यवान वस्तूंबाबत चोरट्यांना काही माहिती मिळाली होती का, याचाही तपास केला जात आहे.

दरम्यान, पोलीस चोरट्यांची ओळख पटवण्याचा आणि घरात नेमक्या कोणत्या पद्धतीने चोरी करण्यात आली, याचा तपशील मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणात अद्याप चोरट्यांची ओळख पटलेली नसून, पुढील तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा