27.6 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरराजकारण...म्हणून प्रवेश कुमार यांनी युवकाच्या कानशिलात लगावली

…म्हणून प्रवेश कुमार यांनी युवकाच्या कानशिलात लगावली

रस्त्याच्या पाहणीदरम्यान गोंधळ

Google News Follow

Related

दिल्लीतील तिलक नगर परिसरात रस्त्याच्या पाहणीदरम्यान मोठा गोंधळ उडाला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री प्रवेश वर्मा आणि आम आदमी पक्षाचे आमदार जरनैल सिंह यांच्यात रस्त्याच्या कामाच्या दर्जावरून जोरदार वाद झाला. याचवेळी एका युवकाने मोबाइल कॅमेऱ्यातून या प्रकाराचे चित्रीकरण सुरू केले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्रवेश वर्मा यांनी त्या युवकाचा मोबाइल खाली करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला थप्पड मारल्याचे दिसत आहे. घटनेमुळे पाहणीचा विषय बाजूला पडून दिल्लीच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

तिलक नगरमधील रस्त्याच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी मंत्री प्रवेश वर्मा पोहोचले होते. त्यावेळी आमदार जरनैल सिंह यांनी रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी रस्त्याचा काही भाग हाताने उचलून दाखवत बांधकाम किती निकृष्ट आहे, असा सवाल केला. त्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. हा वाद सुरू असतानाच साहिब सिंह नावाचा युवक मोबाइलवरून संपूर्ण प्रकार रेकॉर्ड करत होता. व्हिडिओमध्ये वर्मा त्याच्याकडे जाताना, त्याचा मोबाइल खाली करताना आणि त्यानंतर त्याला थप्पड मारताना दिसतात.
हे ही वाचा:
१ ऑक्टोबरपासून एफडीचे नियम बदलणार

‘बिग बॉस’ फेम दिव्या शिंदे खंडणी, मारहाण प्रकरणी गेली गजाआड

बंगालमधील २७ लाख नावे ममतांमुळेच वगळली!

२५ रुपये लिटर इंधनावर धावणार कार

सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आम आदमी पक्षाने मंत्री प्रवेश वर्मा यांच्यावर जोरदार टीका करत कारवाईची मागणी केली आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेत वर्मा यांच्या अटकेची मागणी केली. दुसरीकडे, प्रवेश वर्मा यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपली बाजू मांडताना संपूर्ण घटनेचे सत्य समजून घेण्याचे आवाहन केले आहे. “जे घडले ते घडायला नको होते,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यामुळे रस्त्याच्या कामाच्या पाहणीपासून सुरू झालेला हा वाद आता थप्पड प्रकरणावरून दिल्लीच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा