28 C
Mumbai
Monday, September 28, 2026
घरविशेषलवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे वर्ग १० दिवस बंद, परीक्षा ढकलल्या पुढे

लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे वर्ग १० दिवस बंद, परीक्षा ढकलल्या पुढे

आंदोलनानंतर विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

पंजाबमधील फगवाडा येथील खासगी विद्यापीठ लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन हिंसक झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. २८ सप्टेंबरपासून नियमित वर्ग १० दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले असून, मिड-टर्म परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षांचे नवीन वेळापत्रक नंतर विद्यापीठाच्या प्रशासनाकडून जाहीर केले जाणार आहे.

विद्यापीठ परिसरात एका विद्यार्थिनीवर कथित बलात्कार झाल्याच्या आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. विद्यापीठ प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावत, अफवा खोट्या आणि बनावट असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल करून प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.

रविवारी आंदोलनाला हिंसक वळण लागले. काही आंदोलकांनी विद्यापीठातील मालमत्तेची तोडफोड केली, वाहनांना आग लावली आणि पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली. विद्यार्थ्यांनी जालंधर-फगवाडा राष्ट्रीय महामार्गावरही ठिय्या दिल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने १० दिवस वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या कालावधीत विद्यार्थ्यांना पालकांच्या संमतीने आपल्या गावी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. जे विद्यार्थी कॅम्पसमध्येच राहतील, त्यांनी हॉस्टेल किंवा निवासस्थानी राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि आंदोलनाशी संबंधित कोणत्याही उपक्रमात सहभागी होऊ नये, असे विद्यापीठाने सांगितले आहे.

हे ही वाचा:

चार वर्षांत १११ खासदार-आमदारांनी बदलला पक्ष

बेंगळुरूत विनाहेल्मेटबद्दल दंड…नंतर कळले ते होते गिटार!

२४ कॅरेट सोन्याचा भाव १.५१ लाखांवर

दिघी शिपयार्ड; मोठी जहाजं, मोठी स्वप्नं!

दरम्यान, पोलिसांकडून कथित घटनेचा तपास सुरू आहे. तपासात सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक पुरावे आणि फोनशी संबंधित माहिती तपासली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पसरलेल्या दाव्यांमागील नेमके तथ्य तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. सध्या विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आणि अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. वर्ग आणि परीक्षा पुन्हा कधी सुरू होतील, याबाबत पुढील सूचना विद्यापीठाकडून दिली जाणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा