28 C
Mumbai
Monday, September 28, 2026
घरविशेषबोईंग ७३७ मॅक्सच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड

बोईंग ७३७ मॅक्सच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड

भारतातील ९६ विमानांवर परिणामाची शक्यता

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

बोईंग ७३७ मॅक्स विमानांच्या कॉकपिटमधील सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक समस्या आढळून आली आहे. या समस्येमुळे विमानाचे लँडिंग अयशस्वी झाल्यानंतर पुन्हा लँडिंगचा प्रयत्न करताना स्वयंचलित उड्डाण मार्गदर्शन प्रणालीमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतात एअर इंडिया एक्सप्रेस आणि अकासा एअर या दोन विमान कंपन्यांकडे मिळून बोईंग ७३७ मॅक्सची सुमारे ९६ विमाने आहेत. त्यामुळे या तांत्रिक समस्येचा भारतीय विमान कंपन्यांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडिया एक्सप्रेसच्या ताफ्यात सुमारे ५३, तर अकासा एअरकडे ४३ बोईंग ७३७ मॅक्स विमाने आहेत. बोईंगने गेल्या महिन्यातच जगभरातील ७३७ मॅक्स विमाने चालवणाऱ्या विमान कंपन्यांना या सॉफ्टवेअरमधील समस्येबाबत माहिती दिली होती. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा करण्याचे काम सुरू असल्याचे बोईंगने सांगितले आहे.

या तांत्रिक समस्येबाबत अकासा एअरने बोईंगसोबत समन्वय सुरू असल्याचे सांगितले आहे. तसेच, या समस्येमुळे आपल्या विमानांच्या सुरक्षिततेवर कोणताही परिणाम झालेला नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. अकासा एअरची विमाने निश्चित सुरक्षा प्रक्रियांचे आणि लागू असलेल्या विमान वाहतूक नियमांचे पालन करून कार्यरत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, एअर इंडिया एक्सप्रेसकडून या प्रकरणावर तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. जगभरात बोईंगने आतापर्यंत ७३७ मॅक्सची २,४०० हून अधिक विमाने विमान कंपन्यांना दिली आहेत.

हे ही वाचा:

बंगळुरूमध्ये ट्रॅफिकचा कहर; सोसायटीतून बाहेर पडायलाच ३० मिनिटे

लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे वर्ग १० दिवस बंद, मिड-टर्म परीक्षा ढकलल्या पुढे

चार वर्षांत १११ खासदार-आमदारांनी बदलला पक्ष

बेंगळुरूत विनाहेल्मेटबद्दल दंड…नंतर कळले ते होते गिटार!

नेमकी समस्या काय?

ही समस्या विमानाच्या कॉकपिटमधील सॉफ्टवेअरशी संबंधित आहे. एखाद्या विमानाला लँडिंग करता आले नाही आणि वैमानिकाने पुन्हा हवेत झेप घेत दुसऱ्यांदा लँडिंग करण्याचा प्रयत्न केला, तर त्या वेळी विमानाचा ठरवलेला उड्डाण मार्ग किंवा उंची बदलल्यास ही समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत विमानाची स्वयंचलित उड्डाण मार्गदर्शन प्रणाली योग्य प्रकारे कार्य करणे थांबवू शकते किंवा बंद होऊ शकते. त्यामुळे विमानाचे स्वयंचलित मार्गदर्शन उपलब्ध राहणार नाही. मात्र, याचा अर्थ विमान उडवता येणार नाही किंवा वैमानिकाचा विमानावरील ताबा सुटेल, असा नाही. बोईंगने स्पष्ट केले आहे की, अशा परिस्थितीचा सुरक्षितपणे सामना करण्यासाठी वैमानिकांकडे आवश्यक प्रक्रिया आधीपासूनच उपलब्ध आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा