29 C
Mumbai
Sunday, October 4, 2026
घरक्राईमनामाउज्जैनमध्ये शाही मशिदीचा भाग पाडण्यावरून पोलिसांवर दगडफेक

उज्जैनमध्ये शाही मशिदीचा भाग पाडण्यावरून पोलिसांवर दगडफेक

सिंहस्थ २०२८च्या तयारीवरून तणाव

Google News Follow

Related

मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये सिंहस्थ २०२८च्या तयारीसाठी प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाच्या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाला आहे. शाही मशिदीचा काही भाग हटवण्याच्या प्रशासनाच्या कारवाईविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारी (२८ सप्टेंबर) हिंसक वळण लागल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडून पोलिसांवर दगडफेक केल्याने परिस्थिती चिघळली. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

रस्ता रुंदीकरणाच्या प्रस्तावित आराखड्यात शाही मशिदीचा काही भाग येत आहे. सिंहस्थ २०२८च्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थापन आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी रस्ता १५ मीटरपर्यंत रुंद करण्याचे नियोजन आहे. या कारवाईला विरोध करत शनिवारी रात्रीपासून मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक आणि मुस्लिम समाजातील लोक मशिदीच्या परिसरात जमले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मशिदीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांसोबत रॅपिड ऍक्शन फोर्स आणि विशेष कृती दलाच्या जवानांचीही तैनाती करण्यात आली होती. रविवारी परिसरात सुरक्षा दलांनी संचलनही केले होते.

मात्र, सोमवारी आंदोलनादरम्यान परिस्थिती बिघडली. आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडत निषेध केल्याचे वृत्त आहे. परिसरात दगडफेकीची घटना घडल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. या घटनेत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, शाही मशिदीचा काही भाग हटवण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला मशिदीच्या व्यवस्थापनाने न्यायालयात आव्हान दिले आहे. ९ सप्टेंबर रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने रस्ता रुंदीकरणासाठी मशिदीचा संबंधित भाग हटवण्याच्या कारवाईला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या होत्या. न्यायालयाने या प्रकरणात प्रशासनाने कायदेशीर प्रक्रिया पाळल्याचे नमूद केले होते. न्यायालयाच्या निरीक्षणानुसार, याच रस्त्यावर यापूर्वी १० मंदिरांसह एका मशिदीचे काही भाग हटवण्यात आले असून, उज्जैनमध्ये रस्ता रुंदीकरणाच्या प्रक्रियेत सुमारे ८० धार्मिक स्थळांशी संबंधित कारवाई करण्यात आली आहे. सिंहस्थादरम्यान मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने वाहतूक आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्ता रुंदीकरण आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

हे ही वाचा:

बोईंग ७३७ मॅक्सच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड

बंगळुरूमध्ये ट्रॅफिकचा कहर; सोसायटीतून बाहेर पडायलाच ३० मिनिटे

लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे वर्ग १० दिवस बंद, मिड-टर्म परीक्षा ढकलल्या पुढे

चार वर्षांत १११ खासदार-आमदारांनी बदलला पक्ष

शाही मशिदीच्या व्यवस्थापनाने मात्र मशिदीचा भाग हटवण्यास विरोध केला आहे. मशिदीचा इतिहास सुमारे ६३६ वर्षांचा असल्याचा दावा करण्यात आला असून, धार्मिक स्थळाला वगळून रस्ता रुंदीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणावर उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोरही याचिका प्रलंबित असल्याचे वृत्त आहे. सध्या उज्जैनमध्ये परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मशिदीच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. रस्ता रुंदीकरण आणि शाही मशिदीच्या कारवाईचा मुद्दा न्यायालयीन प्रक्रियेत असतानाच आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने प्रशासनासमोरील आव्हान वाढले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा