31 C
Mumbai
Monday, October 5, 2026
घरविशेषदहशतवादामुळे सर्वाधिक प्रभावित देशांच्या यादीत पाकिस्तान अव्वल

दहशतवादामुळे सर्वाधिक प्रभावित देशांच्या यादीत पाकिस्तान अव्वल

‘ग्लोबल टेररिझम इंडेक्स २०२६’ ची आकडेवारी

Google News Follow

Related

जगभरात दहशतवादाचा आलेख खाली येत असताना पाकिस्तानमधील परिस्थिती मात्र याच्या उलट असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षभरात पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले आणि त्यातील मृत्यू वाढले असून, ‘ग्लोबल टेररिझम इंडेक्स २०२६’मध्ये पाकिस्तानने बुर्किना फासोला मागे टाकत पहिले स्थान मिळवले आहे. पाकिस्तान पहिल्यांदाच दहशतवादामुळे सर्वाधिक प्रभावित देश ठरला आहे.

‘इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस’च्या अहवालानुसार, २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये दहशतवादाच्या १,०४५ घटना घडल्या आणि त्यात १,१३९ जणांचा मृत्यू झाला. दहशतवादामुळे झालेल्या मृत्यूंच्या संख्येत मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पाकिस्तानमध्ये सलग सहाव्या वर्षी दहशतवादामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे.

याउलट, याच कालावधीत जगभरातील दहशतवादामुळे होणारे मृत्यू २८ टक्क्यांनी घटून ५,५८२ झाले. तसेच, दहशतवादी घटनांची संख्या २२ टक्क्यांनी घटून २,९४४ वर आली. त्यामुळे पाकिस्तानमधील वाढता दहशतवाद आणि जगातील एकूण परिस्थिती यातील विरोधाभास स्पष्ट झाला आहे. पाकिस्तानमध्ये आत्मघाती हल्ल्यांची मालिकाही सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी खैबर पख्तूनख्वा प्रांतात झालेल्या एका आत्मघाती हल्ल्यात ११ जणांचा मृत्यू झाला. याशिवाय बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनेही मोठ्या प्रमाणात हल्ले केले आहेत.

हे ही वाचा:

उज्जैनमध्ये शाही मशिदीच्या कारवाईवरून राडा; पोलिसांवर दगडफेक

बोईंग ७३७ मॅक्सच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड

बंगळुरूमध्ये ट्रॅफिकचा कहर; सोसायटीतून बाहेर पडायलाच ३० मिनिटे

लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे वर्ग १० दिवस बंद, मिड-टर्म परीक्षा ढकलल्या पुढे

टीटीपी सर्वाधिक सक्रिय दहशतवादी संघटना

अहवालानुसार, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ही पाकिस्तानमधील सर्वाधिक घातक दहशतवादी संघटना ठरली आहे. २०२५ मध्ये पाकिस्तानातील दहशतवादाशी संबंधित ५६ टक्के मृत्यू टीटीपीशी संबंधित होते. या संघटनेने वर्षभरात ५९५ हल्ले केले, ज्यात ६३७ जणांचा मृत्यू झाला. पाकिस्तानच्या पश्चिम भागात दहशतवादाचा सर्वाधिक परिणाम दिसून आला. बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा या दोन प्रांतांमध्ये २०२५ मधील ७४ टक्क्यांहून अधिक दहशतवादी हल्ले झाले. तसेच, देशातील दहशतवादाशी संबंधित ६७ टक्के मृत्यू याच दोन प्रांतांमध्ये नोंदवण्यात आले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा