30 C
Mumbai
Friday, October 2, 2026
घरविशेष...आणि दुसऱ्या हल्ल्यानंतर मोजतबा खामेनींना ढिगाऱ्याखालून काढले

…आणि दुसऱ्या हल्ल्यानंतर मोजतबा खामेनींना ढिगाऱ्याखालून काढले

इराणच्या एका धर्मगुरूंनी केला दावा

Google News Follow

Related

इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई हे अमेरिकेच्या दुसऱ्या हवाई हल्ल्यातूनही बचावले. सुरुवातीच्या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर त्यांना तेहरानमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्या रुग्णालयावरही हल्ला झाला आणि मोजतबा यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आल्याचा दावा इराणच्या एका धर्मगुरूंनी केला आहे.

इराणच्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सचे सदस्य मोहसेन हैदरी यांनी कतारच्या अल अरबी या दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेच्या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर मोजतबा यांना तेहरानमधील रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्या वैद्यकीय केंद्रावरही बॉम्बहल्ला झाला.

हैदरी म्हणाले, “ते जखमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर तेहरानमधील तीन रुग्णालयांवर बॉम्बहल्ले करण्यात आले. मोजतबा खामेनेई तिसऱ्या रुग्णालयात होते आणि त्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले.”

हे ही वाचा:

‘कॉकरोच’ना शिवाजी पार्कमध्ये आंदोलनाची परवानगी नाकारली

बोईंग ७३७ मॅक्सच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड

माफी मागून मोकळे झाले होते, डोवालांविरुध्द खोटे विकणारे…

रमीकल्चरची ५०० कोटींची मालमत्ता जप्त

मोजतबा खामेनेई यांचे वय ५६ वर्षे असून, अमेरिका-इराण युद्ध सुरू झाल्यापासून ते सार्वजनिक ठिकाणी दिसलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत तसेच ते नेमके कुठे आहेत, याबाबत अनेक तर्कवितर्क सुरू आहेत. दरम्यान, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी १२ सप्टेंबर रोजी इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत मोजतबा खामेनेई जिवंत असून इराणच्या कारभारावर त्यांचे नियंत्रण कायम असल्याचे सांगितले होते.

मोजतबा यांच्या ठावठिकाणाबाबत गोपनीयता का ठेवण्यात आली आहे, याचे स्पष्टीकरण देताना पेझेश्कियन यांनी सांगितले की, अमेरिकन आणि इस्रायली सैन्याने इराणच्या वरिष्ठ नेत्यांना आणि लष्करी कमांडरांना लक्ष्य केले होते. त्यामुळे सर्वोच्च नेत्याच्या ठिकाणाची माहिती गुप्त ठेवणे आवश्यक होते.

ट्रम्प यांचा दावा काय?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मोजतबा खामेनेई यांचा मृत्यू झालेला नसल्याचे म्हटले होते. मात्र, ते गंभीर जखमी झाल्याचा दावा त्यांनी केला होता. ऑगस्टमध्ये पुराणमतवादी रेडिओ होस्ट ग्लेन बेक यांच्याशी बोलताना ट्रम्प म्हणाले होते की, “मला वाटत नाही की त्यांचा मृत्यू झाला आहे. ते अतिशय गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या शरीराच्या डाव्या बाजूला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. मात्र, मला वाटत नाही की ते मृत आहेत.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा