30.4 C
Mumbai
Thursday, October 15, 2026
घरस्पोर्ट्सएकही चेंडू न खेळता टीम इंडिया सेमीफायनलमध्ये!

एकही चेंडू न खेळता टीम इंडिया सेमीफायनलमध्ये!

Google News Follow

Related

एशियन गेम्स २०२६ मध्ये टीम इंडियाने दमदारपणे सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील क्वार्टर फायनल सामना मुसळधार पावसामुळे रद्द करण्यात आला. सामना सुरू होण्यापूर्वीच मैदानावर पावसाने जोर धरल्याने टॉसही होऊ शकला नाही.

भारताची आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारी अफगाणिस्तानपेक्षा वरची असल्याने सामना रद्द झाल्यानंतर भारतीय संघाला थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश देण्यात आला. भारत टी-२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर, तर अफगाणिस्तान दहाव्या क्रमांकावर आहे.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आता १ ऑक्टोबरला दुसरा सेमीफायनल सामना खेळणार आहे. त्यामुळे पावसामुळे सामना रद्द झाला असला, तरी भारताचे पदक जिंकण्याचे लक्ष्य कायम आहे.

याआधी याच मैदानावर पाकिस्तान आणि हाँगकाँग (चीन) यांच्यातील पहिला क्वार्टर फायनल सामनाही पावसामुळे रद्द झाला. टी-२० क्रमवारीत पाकिस्तानचे स्थान वरचे असल्याने पाकिस्ताननेही सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.

उर्वरित दोन क्वार्टर फायनल सामन्यांमध्ये श्रीलंका-नेपाळ आणि बांगलादेश-मलेशिया यांच्यात लढत होणार आहे.

एशियन गेम्सपूर्वी भारताने जपानविरुद्ध एकमेव टी-२० सामना खेळला होता. पावसामुळे हा सामना ५-५ षटकांचा करण्यात आला. भारताने अत्यंत अटीतटीच्या सामन्यात जपानचा २ धावांनी पराभव केला होता.

भारताने प्रथम फलंदाजी करताना ५ षटकांत ४ बाद ३२ धावा केल्या. अभिषेक शर्मा खाते न उघडताच बाद झाला, तर ईशान किशन, संजू सॅमसन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनाही मोठी खेळी करता आली नाही. भारताच्या डावात केवळ २ चौकार लागले.

मात्र, अक्षर पटेलच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारताने जपानला ३० धावांवर रोखत २ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. आता सेमीफायनलमध्ये भारताच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा