28.9 C
Mumbai
Saturday, October 10, 2026
घरक्राईमनामाठाण्यात बाळू पूर्णेकर हत्येप्रकरणी सहकारी पप्या शिंदे अटकेत

ठाण्यात बाळू पूर्णेकर हत्येप्रकरणी सहकारी पप्या शिंदे अटकेत

राजकीय वैमनस्यातून कट रचल्याचा संशय

Google News Follow

Related

ठाण्यातील मानपाडा भागात मंगळवारी रात्री शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू यशवंत पूर्णेकर यांची कार्यालयात घुसून गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या थरारक घटनेने संपूर्ण ठाणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात पप्या शिंदे, संतोष कनोजिया, निखिल यादव यांच्यासह पाच हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पोलिसांनी पप्या शिंदेला अटक करण्यात आली असून इतर हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. हा हल्ला राजकीय वादातून झाला असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत असून बेकायदेशीर धंद्या विरुद्ध पूर्णेकर यांनी तक्रार केली होती त्यातून हे हत्याकांड घडले का? त्याचा ही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व तक्रारदार मंदार बबन घोडके यांनी नोंदवलेल्या फिर्यादीनुसार, २९ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास प्रदीप पूर्णेकर हे मानपाडा, गणेशनगर चर्च जवळील आपल्या कार्यालयात बसले होते. त्यावेळी पूर्णेकर यांचा जुना सहकारी पप्या शिंदे कार्यालयात आला. पूर्णेकर आणि शिंदे यांनी तक्रारदार मंदार घोडके व त्यांचा मित्र राहुल जैस्वाल यांना बाहेर जाण्याचा इशारा केला.

घोडके व जैस्वाल कार्यालयाबाहेर पडताच संतोष उर्फ टल्ली कनोजिया, निखिल यादव उर्फ शूटर, तोंडाला पांढरा रुमाल बांधलेला एक इसम आणि काळ्या रंगाचे हेल्मेट परिधान केलेला एक अनोळखी व्यक्ती कार्यालयात घुसले. काही क्षणांतच कार्यालयातून एकापाठोपाठ चार ते पाच गोळ्या झाडल्याचा आवाज आला. गोळीबाराचा आवाज ऐकून नागरिक व तक्रारदार घटनास्थळी धावले असता, संतोष कनोजिया आणि त्याचा साथीदार पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून, तर इतर दोघे पायी पळून जाताना दिसले.

कार्यालयात जाऊन पाहिले असता प्रदीप पूर्णेकर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून इन्फिनिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. पूर्णेकर यांच्या मानेवर आणि शरीरावर धारदार शस्त्राने गंभीर वार करण्यात आले होते. घटनेच्या वेळी कार्यालयात उपस्थित असलेल्या पप्या शिंदे याच्या अंगावर रक्ताचे डाग होते, मात्र त्याला कोणतीही इजा झाली नव्हती. तसेच त्याने पूर्णेकर यांना वाचवण्याचा कोणताही प्रयत्न न केल्याने आणि निवडणुकीतील जुन्या राजकीय वादातून हा पूर्वपरियोजित कट रचून हत्या करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

इंडिया आघाडीच्या गर्दीत ममतांना कंठ फुटला

लवलीनाचा ठोसा, सुवर्णाची आशा

राजेश-चिकिथाचा सुवर्णवेध, ऑलिम्पिकचे तिकीट पक्के!

इंडी आघाडीच्या बैठकीकडे आप, डीएमकेची पाठ

दरम्यान, पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी हत्येपूर्वी रेकी करण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यांचे भाऊ जयनाथ पूर्णेकर यांनी, ‘गणपतीपासून हे सर्व सुरू होते. ते रेकी करत होते. बाळूला विश्वास ठेवू नको, असे सांगितले होते,’ असा दावा केला. पूर्णेकर यांचा मुलगा राम प्रदीप पूर्णेकर यांनीही माध्यमांशी बोलताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोर स्पष्ट दिसत असल्याचा दावा केला. ‘माझ्या वडिलांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह येथून हलवणार नाही,’ अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.

या हत्येच्या पार्श्वभूमीवर मनोरमानगर परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. हल्ल्यामागील नेमके कारण, हल्लेखोरांचा पूर्वनिbयोजित कट होता का आणि या हत्येमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस आणि गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.

या प्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी पप्या शिंदे, संतोष उर्फ टल्ली कनोजिया,निखिल यादव उर्फ शूटर आणि दोन अनोळखी असे एकूण पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३(१), ३(५), ६१ तसेच शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला असून,पप्या शिंदेला अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा