29.7 C
Mumbai
Wednesday, October 21, 2026
घरविशेषपहलगाम हल्ल्याच्या तुलनेवरून वाद; वर्षभराने सोनू निगमची माफी

पहलगाम हल्ल्याच्या तुलनेवरून वाद; वर्षभराने सोनू निगमची माफी

कन्नड गाण्याच्या मागणीची केली होती तुलना

Google News Follow

प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम याने कन्नड भाषेच्या मुद्द्यावरून केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल कर्नाटकातील जनतेची माफी मागितली आहे. कर्नाटक रक्षण वेदिकेचे (KRV) अध्यक्ष टी. ए. नारायण गौडा यांच्याशी चर्चा केल्यानंतर सोनू निगमने व्हिडिओच्या माध्यमातून माफीनामा दिला. त्यानंतर सोनू निगमच्या बेंगळुरूतील नियोजित संगीत कार्यक्रमाविरोधातील आंदोलन मागे घेण्याची घोषणा संघटनेने केली आहे.

माफीनामा देताना सोनू निगमने कर्नाटकातील जनतेला आपले कुटुंब संबोधले. गेल्या ३० वर्षांपासून कर्नाटकातील लोकांनी आपल्याला प्रेम आणि आदर दिला आहे. एखाद्या गैरसमजामुळे या नात्यात कटुता निर्माण होऊ नये, अशी आपली इच्छा असल्याचे त्याने सांगितले. “तुमच्यावर प्रेम असेल आणि ते नातं टिकवायचं असेल, तर हजार वेळा माफी मागायलाही हरकत नाही,” अशा आशयाचे वक्तव्य करत सोनूने आपल्या शब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

केआरव्हीचे अध्यक्ष टी. ए. नारायण गौडा यांनी सोशल मीडियावर सोनू निगमचा माफीनामा शेअर केला. सोनूने आपल्याशी संवाद साधून आपल्या विधानामुळे कन्नडिगांच्या भावना दुखावल्याचे मान्य केल्याचे त्यांनी सांगितले. या गायकाविषयी संघटनेची वैयक्तिक नाराजी नसून, वादग्रस्त विधानाला विरोध म्हणून आंदोलन करण्यात आले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सोनू निगमचा बेंगळुरूमध्ये २४ ऑक्टोबरला नियोजित संगीत कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला विरोध करण्याची भूमिका केआरव्हीने यापूर्वी घेतली होती. आता माफीनाम्यानंतर संघटनेने आंदोलन मागे घेतले आहे. नारायण गौडा यांनी कन्नड भाषिक नसतानाही कन्नड चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रात योगदान देणाऱ्या घनतसाला, पी. बी. श्रीनिवास, येसुदास, एस. जानकी, वाणी जयराम आणि के. एस. चित्रा यांसारख्या गायकांचा उल्लेख केला. या कलाकारांना कर्नाटकातील प्रेक्षकांनी प्रेम दिले असल्याचे सांगत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचे संकेत दिले.

हे ही वाचा:

एशियन पॅरा गेम्समध्ये भालाफेकीत भारताचा डबल धमाका! रिंकूला सुवर्ण, अजित सिंहला रौप्य

प्रज्ञान ओझा टीम इंडियाचे नवे मुख्य निवडकर्ते

अधारिका फाउंडेशनच्या ‘नवदुर्गा पुरस्कारां’नी नऊ दृष्टिहीन महिलांचा गौरव

भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात

नेमका वाद काय होता?

या वादाची सुरुवात एप्रिल २०२५ मध्ये बेंगळुरूमधील एका महाविद्यालयात झालेल्या संगीत कार्यक्रमादरम्यान झाली होती. कार्यक्रमात एका प्रेक्षकाने सोनू निगमकडे कन्नड गाण्याची मागणी केली. त्यावर प्रतिक्रिया देताना सोनूने कन्नड गाण्याच्या मागणीचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंध जोडणारे विधान केले होते. या विधानामुळे कर्नाटकातील अनेक नागरिक आणि कन्नड समर्थक संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा