29.7 C
Mumbai
Monday, October 19, 2026
घरबिजनेसभारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात

भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात

अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री रुबिओंचा दावा

Google News Follow

भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार करार लवकरच अंतिम होण्याची शक्यता आहे. अमेरिका भारतासोबतचा व्यापार करार अंतिम करण्याच्या अगदी जवळ पोहोचली असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी सोमवारी (१९ ऑक्टोबर) सांगितले. भारताच्या दौऱ्यापूर्वी रुबिओ यांनी केलेल्या या विधानामुळे दोन्ही देशांमधील व्यापार चर्चेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

रुबिओ सध्या उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर असून, तेथील समरकंद येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत भाष्य केले. अमेरिकेला भारतासोबतचा व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे आणि त्यासाठी दोन्ही देश प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रुबिओ २० ऑक्टोबर रोजी भारतात येणार असून, मुंबईत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी त्यांची बैठक होणार आहे.

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्याबाबतही महत्त्वाची प्रगती झाली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी यापूर्वी या कराराचा पहिला टप्पा निश्चित झाला असून, त्यावर सध्या कायदेशीर मसुद्याचे काम सुरू असल्याचे सांगितले होते. हा करार लवकर अंतिम करून कार्यान्वित करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. मात्र, अमेरिकेच्या बाजारपेठेत भारतीय निर्यातदारांना बांगलादेश, व्हिएतनाम आणि इंडोनेशियासारख्या प्रतिस्पर्धी देशांच्या तुलनेत स्पर्धात्मक फायदा मिळावा, अशी भारताची भूमिका आहे. त्यामुळे करारातील शुल्क, बाजारपेठेतील प्रवेश आणि भारतीय उद्योगांच्या हिताशी संबंधित मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत.

दरम्यान, रशियाकडून तेल आणि वायू खरेदी करणाऱ्या देशांवरील निर्बंधांबाबत अमेरिकेच्या भूमिकेवरही रुबिओ यांनी भाष्य केले. जागतिक ऊर्जा पुरवठा आणि तेलाच्या किमतींवर निर्बंधांचा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे अशा निर्णयांमध्ये अनेक बाबींचा विचार करावा लागतो, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित निर्बंधांमधून सवलत देताना व्यापार कराराच्या चर्चेचाही विचार केला जात असल्याचे रुबिओ यांनी नमूद केले. भौगोलिक परिस्थितीमुळे काही देशांना पर्यायी ऊर्जा स्रोत मिळवणे कठीण जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

टायगर गोळीबारप्रकरणी तिघांना रेल्वेत पकडले

‘लष्कर’ संस्थापक सदस्य मोहम्मद सरवर पायऱ्यांवरून पडून गतप्राण

टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी आरोपींचे धागेदोरे हाती; फडणवीसांची माहिती

प्राध्यापकाकडून कुराण वाचण्याचा, इस्लाम स्वीकारण्याचा हिंदू विद्यार्थिनींना आग्रह

भारत आणि अमेरिका यांनी फेब्रुवारीमध्ये अंतरिम व्यापार करारासाठी चौकट जाहीर केली होती. मात्र, या कराराची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. रुबिओ यांच्या भारत दौऱ्यात व्यापार, ऊर्जा सहकार्य आणि व्यापक आर्थिक संबंधांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा