29.4 C
Mumbai
Monday, October 26, 2026
घरदेश दुनियाब्रिटनमधील वेस्ट यॉर्कशायरमध्ये दसरा, बथुकम्मा उत्सवात 'जिहादी' व्यत्यय

ब्रिटनमधील वेस्ट यॉर्कशायरमध्ये दसरा, बथुकम्मा उत्सवात ‘जिहादी’ व्यत्यय

दोन भाविकांवर हल्ला केल्याची घटना

Google News Follow

युनायटेड किंगडममधील वेस्ट यॉर्कशायर येथे हिंदू समुदायाकडून आयोजित करण्यात आलेल्या दसरा आणि बथुकम्मा उत्सवात कथितरित्या हिंदूविरोधी घटकांच्या गटांनी व्यत्यय आणला. चेहरा झाकलेल्या या गटांनी आयोजकांना धमकावले आणि दोन भाविकांवर हल्ला केला. हे हल्लेखोर बहुधा कट्टर इस्लामी असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही घटना शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी वेकफिल्ड जिल्ह्यातील ऑसेट टाउन हॉल येथे घडली.

इनसाइट यूकेच्या एका अहवालानुसार, हिंदू कुटुंबे हे सण साजरे करण्यासाठी कार्यक्रमस्थळी जमली होती. यावेळी मुले आणि महिलाही उपस्थित होत्या. आयोजकांनी जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, कार्यक्रम नियोजनानुसार सुरू होता. मात्र, हॉलच्या बाहेर काही हिंदूविरोधी घटकांनी लोकांशी धमकीच्या स्वरात वर्तन करण्यास सुरुवात केली.

चेहरा झाकलेल्या लोकांनी केली चौकशी

आयोजकांच्या निवेदनात संपूर्ण संध्याकाळी घडलेल्या अनेक घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. रात्री सुमारे ८.३० वाजता हॉलच्या बाहेर गेलेल्या एका आयोजकाला बालाक्लाव्हा अर्थात चेहरा झाकणारे मुखवटे घातलेले काही कथित इस्लामवादी आढळले. त्यांनी आत काय सुरू आहे, कार्यक्रमाला किती लोक उपस्थित आहेत आणि मुले व तरुण उपस्थित आहेत का, अशी विचारणा केली.

हे ही वाचा:

इंजिनिअरिंग डिझाइनसाठी भारतीय एआय मॉडेल

गरब्यात मुस्लीम तरुणाची हुल्लडबाजी; विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीला थप्पड

सणासुदीपूर्वी आरबीआयकडून बँकांना एक लाख कोटींचा निधी उपलब्ध

“पॅरिस लवकरच बनणार मुस्लिम शहर!”

त्यानंतर प्लेट्स जमा करण्यासाठी बॉक्स घेऊन बाहेर गेलेल्या एका स्वयंसेवकाला इलेक्ट्रिक बाईकवरून आलेल्या तीन जणांनी अडवले. त्यांनी बॉक्समध्ये काय आहे, अशी विचारणा केली आणि त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते तेथून निघून गेले.

दोन भाविक आपली कार घेण्यासाठी बाहेर गेले, तेव्हा परिस्थिती अधिक गंभीर झाली. बाहेर परिस्थिती तणावपूर्ण असल्याची त्यांना आधीच माहिती देण्यात आली होती आणि त्या वेळी कुटुंबीयांसह बाहेर न जाण्याचा सल्ला देण्यात आला होता.

आयोजकांच्या म्हणण्यानुसार, या भाविकांना सुमारे १० जणांचा एक गट आढळला. त्यांचे वय अंदाजे १६ ते २० वर्षांच्या दरम्यान असल्याचे मानले जात आहे. त्यापैकी एका व्यक्तीने शिवीगाळ केली आणि ते तिथे काय करत आहेत, अशी विचारणा केली. त्यानंतर या गटाने दोन्ही भाविकांवर हल्ला केला. एका भाविकाच्या चेहऱ्यावर, तर दुसऱ्याच्या डोक्यावर प्रहार करण्यात आला. दोघेही जमिनीवर कोसळले आणि त्यांच्या शरीरातून रक्तस्राव झाला.

इमारतीच्या बाहेर सुमारे १५ ते २० जणांचा आणखी एक जमाव जमा झाल्यानंतर पोलिसांना पहिला फोन करण्यात आला. यातील काही जण बाईकवर होते, तर काहींनी कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना चिथावले आणि आत असलेल्या लोकांकडे हातवारे केले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा