29.7 C
Mumbai
Monday, October 26, 2026
घरक्राईमनामामाटुंग्याच्या आयसीटी वसतिगृहात विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

माटुंग्याच्या आयसीटी वसतिगृहात विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

नाशिकच्या सिद्धेश पाटीलचे टोकाचे पाऊल

Google News Follow

माटुंगा येथील नामांकित ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’च्या (आयसीटी) वसतिगृहात एका विद्यार्थ्याने छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिद्धेश पाटील (वय १९) असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो रासायनिक अभियांत्रिकीच्या (केमिकल इंजिनीअरिंग) दुसऱ्या वर्षात शिकत होता.

सिद्धेश हा मूळचा नाशिकचा रहिवासी होता. या प्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची (एडी) नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धेश गेल्या काही काळापासून नैराश्याने ग्रस्त होता आणि त्यावर त्याचे उपचारही सुरू होते, अशी माहिती त्याच्या वर्गमित्रांनी दिली. मंगळवारी रात्री सिद्धेशच्या मनात आत्महत्येचे विचार येत असल्याने त्याने याबाबत आपल्या डॉक्टरांना सांगितले. डॉक्टरांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि माहिती दिली.

हे ही वाचा:

आग विझविणाऱ्या रोबोटला डीजीक्यूएची मंजुरी

अल्बानियातील जाळपोळीच्या पोस्टप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार

सिमरन शर्माची सुवर्णधाव!

दिल्ली उच्च न्यायालयाने रांका, दासला विचारले, तुम्ही जेन झी कसे?

कुटुंबीयांनी तात्काळ वसतिगृहातील त्याच्या मित्रांना फोन करून सिद्धेशच्या खोलीत जाण्यास सांगितले. मित्र धावपळ करत त्याच्या खोलीत पोहोचले असता सिद्धेश गंभीर अवस्थेत आढळून आला. मित्रांनी त्याला तातडीने सीपीआर देऊन वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि लगेचच सायन रुग्णालयात हलवले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

सिद्धेशवर नैराश्यावर उपचार सुरू असल्याचे स्पष्ट झाले असले, तरी त्याने हे टोकाचे पाऊल नेमके का उचलले, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अनुराग जैन यांनी दिली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा