28 C
Mumbai
Tuesday, October 27, 2026
घरराजकारणवृक्षतोडीचे ‘फेक नरेटिव्ह’ पसरवून क्लीन एनर्जी रोखू नका!

वृक्षतोडीचे ‘फेक नरेटिव्ह’ पसरवून क्लीन एनर्जी रोखू नका!

मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांचा डाव हाणून पाडला

Google News Follow

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरेंट पॉवरच्या जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिक आणि विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले असून, विरोधकांचा ‘फेक नरेटिव्ह’ पसरवण्याचा डाव हाणून पडला आहे. कर्जतचा पंप स्टोरेज प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, हा प्रकल्प एका दिवसात तयार झालेला नाही. सुमारे १८ महिने विविध सुनावण्यांना सामोरे गेल्यानंतर आणि कायदेशीर मंजुरी मिळाल्यानंतरच प्रकल्प पुढे नेण्यात येत आहे. समाजातील सर्व घटकांचा विचार करून प्रकल्पाचे नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पामुळे कोणाचीही उपजीविका नष्ट होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. तरीही एखाद्या घटकाच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास पुनर्वसनाचा योग्य विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. स्थानिक ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून त्यातून मार्ग काढण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे.

विरोधकांच्या फेक नरेटिव्ह वरून त्यांनी निशाणा साधत म्हटले आहे की, राज्यात येणारी क्लीन एनर्जी थांबवू नये. हा प्रकल्प कोळशावर आधारित नसून स्वच्छ ऊर्जेच्या निर्मितीला आणि साठवणुकीला पूरक असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. सौर ऊर्जेची उपलब्धता कमी असलेल्या वेळेत विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी पंप स्टोरेज प्रकल्प महत्त्वाचे ठरू शकतात. अशा प्रकल्पांमुळे कोळशावर आधारित विजेवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होऊ शकते, अशी सरकारची भूमिका आहे.

हे ही वाचा:

टेरर फंडिंगप्रकरणी काश्मीरमध्ये चार महिलांसह सहा जणांना अटक

दहिसरमध्ये १३ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण; पोक्सोअंतर्गत तरुणाला अटक

‘स्टारलिंक’ ठरतेय युद्धातील निर्णायक कडी!

विशेष मुलांच्या आई स्वाती मोहिते यांना ‘केशवसृष्टी पुरस्कार’

माहितीनुसार, प्रस्तावित प्रकल्प भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यापासून सुमारे १६ किलोमीटर, तर भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर आहे. प्रकल्पाचे क्षेत्र इको-सेन्सिटिव्ह झोनच्या बाहेर असल्याचा दावाही त्यांनी केला. या प्रकल्पामुळे कोळशाचे ज्वलन आणि त्यातून होणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत होईल, तसेच औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाण्याची बचत होईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा