29.7 C
Mumbai
Monday, October 26, 2026
घरराजकारणराजकारणातील भाषेचा स्तर घसरतोय!

राजकारणातील भाषेचा स्तर घसरतोय!

प्रियांका चतुर्वेदी यांनी खरगेंना सुनावले

Google News Follow

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्यावरून सुरू असलेल्या राजकीय वादावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात सर्वच पक्षांच्या भाषेचा स्तर सातत्याने घसरत असून, ही दुर्दैवी बाब आहे, असे त्या म्हणाल्या. खरगे यांच्या वक्तव्यामुळे मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलित केले जात असल्याचे सांगत प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, ज्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, अशा आई-वडील, बहीण, मुलगी किंवा मुलांना राजकीय वादात ओढणे पूर्णपणे चुकीचे आहे.

प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, “राजकारणात सर्वांच्याच भाषेचा स्तर सातत्याने घसरत आहे, ही दुर्दैवी बाब आहे. देशासमोर महागाई, भ्रष्टाचार आणि मतांची चोरी यांसारखे महत्त्वाचे प्रश्न आहेत. देशातील तरुणांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे; मात्र या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. पुन्हा एकदा मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार आहे.” सर्व राजकीय पक्षांनी आपल्या भाषेवर नियंत्रण ठेवून संयमित शब्दांत भूमिका मांडावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

हे ही वाचा:

अमित शाह यांच्यावरील टिप्पणीप्रकरणी राहुल गांधी निर्दोष

राहुल गांधींच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या

वाराणसीच्या एअर शोदरम्यान लष्करी अधिकारी असल्याचा बनाव

गुजरातमध्ये भारतीय हद्दीत घुसलेल्या चार पाकिस्तानी मच्छीमारांना अटक

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील आंदोलनाबाबतही प्रियांका चतुर्वेदी यांनी भूमिका मांडली. विद्यापीठात सध्या सुरू असलेले आंदोलन विद्यार्थी संघटना आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांशी संबंधित असल्याचे त्या म्हणाल्या. या आंदोलनात काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगढी यांच्यासह काही नेते सहभागी झाले होते. त्यांच्याविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला. विद्यापीठात विद्यार्थी संघटना स्थापन करायची की नाही, हा निर्णय विद्यापीठ प्रशासन आणि विद्यार्थ्यांनी घ्यायचा आहे. त्यात राजकीय हस्तक्षेप करण्याचे कारण काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा