30 C
Mumbai
Tuesday, October 27, 2026
घरस्पोर्ट्सअभिषेकच्या वादळात न्यूझीलंड भुईसपाट!

अभिषेकच्या वादळात न्यूझीलंड भुईसपाट!

Google News Follow

अभिषेक शर्माच्या तुफानी फलंदाजीने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची अक्षरशः दाणादाण उडवली! अवघ्या ३८ चेंडूंत शतक झळकावत अभिषेकने भारतीय संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडने दिलेले १९९ धावांचे आव्हान अवघ्या १३.२ षटकांत चार विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. या विजयासह भारताने मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली.

अभिषेकच्या आक्रमक शतकासह वैभव सूर्यवंशीच्या फटकेबाजीनेही सामन्यात रंगत आणली. दोघांनी मिळून पहिल्या सहा षटकांत तब्बल ११८ धावा कुटल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पॉवरप्लेमधील हा विश्वविक्रम ठरला. पहिल्याच चेंडूपासून भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि सामन्याचे चित्रच पालटून टाकले.

अभिषेकने अवघ्या २० चेंडूंत ६७ धावा ठोकत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना बॅकफूटवर ढकलले. त्यानंतरही त्याची फटकेबाजी सुरूच राहिली. त्याने ३८ चेंडूंत ९ चौकार आणि ११ षटकारांच्या मदतीने ११३ धावांची स्फोटक खेळी साकारली. त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे चौथे शतक ठरले.

दुसऱ्या बाजूने वैभव सूर्यवंशीने १९ चेंडूंत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ४५ धावा फटकावल्या. भारताला १३३ धावांवर पहिला धक्का बसला. अभिषेक १७८ धावांवर बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर ५ आणि संजू सॅमसन १८ धावा करून माघारी परतले. मात्र, भारताच्या विजयाची गाडी थांबली नाही. नमन धीर ४ आणि तिलक वर्मा १ धावेवर नाबाद राहिले.

त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत ३ बाद १९८ धावा केल्या. मिचेलने ५२ चेंडूंत ५ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ८९ धावा केल्या. त्याला जेकब्सने २३ चेंडूंत नाबाद ३९ धावा करत उत्तम साथ दिली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद ७५ धावांची भागीदारी केली. सलामीवीर अ‍ॅलनने २५ चेंडूंत ४० धावा केल्या.

मात्र, न्यूझीलंडच्या फलंदाजांची मेहनत अभिषेकच्या वादळी शतकासमोर अपुरी ठरली. भारतीय संघाने लक्ष्याचा पाठलाग करताना टी-२० क्रिकेटमधील आपल्या आक्रमकतेची झलक दाखवली आणि मालिकेवर निर्विवाद वर्चस्व मिळवले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा